Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये आणि देशात वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७२.७७ सेंटवर होते. देशातील वायदेही ५६ हजार ४२० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याच्या भावाला चांगला आधार आहे. कांद्याच्या बाजारात काही वेळा चढ उतारही दिसून येत आहेत. सध्या कांद्याचा सरासरी भाव २२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
भारतात तुरीची टंचाई आहे त्यामुळे भारताला तुरीची गरज आहे, हे लक्षात घेऊन निर्यातदार देशांनी तुरीचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे आयात तुरीचे भावही १२ हजारांच्या दरम्यान आहेत. आयात तूर महाग झाल्याने देशात भाव टिकून आहेत. देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे. सध्या तुरीला सरासरी ११ हजार ते ११ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.