Onion Market : केंद्राकडून बाजारभावापेक्षा दर पाडून कांदा खरेदी

Onion Rate : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. खरेदी सुरू झाल्यापासून बाजार समितीच्या दरापेक्षा ते कमीच निघाले आहेत.

चालू सप्ताहात प्रतिक्विंटल २,५५५ रुपये दर जाहीर केले आहे. तर बाजारात २,७०० ते ३,००० रुपयांपर्यंत दर आहे. यात सरासरी १०० ते ३०० इतकी तफावत आहे. त्यामुळे ग्राहक व्यवहार विभागाच्या दर ठरवण्याबाबत गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ला ५ लाख टन कांदा खरेदीची परवानगी दिली. चालूवर्षी कांदा दर ठरविण्याचा अधिकार स्वतः विभागाने राखून ठेवला.

यापूर्वी नाफेड व एनसीसीएफ हे दोन्ही प्रमुख खरेदीदार प्रमुख बाजार समित्यांच्या तीन दिवसांचे दर घेऊन त्याची सरासरी निश्चित करून दर जाहीर करत असे. मात्र यंदा त्यात बदल झाल्याने खरेदी केंद्र व प्रामुख्याने शेतकरी अडचणीत आहे.

Onion Market
Onion Market Rate : कांदा खरेदीच्या भावावरून आणखी एक जुमला? शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणार का? 

मे महिन्यात दुसऱ्या सप्ताहात कांद्याची खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला १६५०, त्यानंतर १८५०, तिसऱ्या टप्प्यात २१०५ तर आता २५५५ रुपये दर काढले आहेत. पहिल्यापासून निघालेले हे दर कधीही स्पर्धात्मक नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. पारंपरिक पद्धतीने बाजार समित्यांमध्ये तुलनात्मक चांगले दर मिळत आहेत.

त्यामुळे केंद्राची खरेदी लक्ष्यांकाच्या १० टक्क्यांच्या आत आहे. आता नव्याने दर जाहीर होताना ते स्पर्धात्मक असतील अशी अपेक्षा होती; मात्र शेतकऱ्यांच्या अर्थकारणाकडे लक्ष न देता ग्राहकांच्या फायद्याचाच विचार या माध्यमातून होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या वल्गना करून ग्राहकहिताचा छुपा अजेंडा पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कामकाजातून पुढे आला आहे.

Onion Market
Onion Export: कांदा निर्यातबंदीचा फटका बसल्याचे अजित पवारांनी केले मान्य

जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी होणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होते. सत्ताधारी पक्षांनी या कांदा खरेदीचे राजकीय भांडवल निवडणुकीदरम्यान केले. मात्र निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. स्पर्धात्मक दरात ही खरेदी होत असल्याने यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीला खोडा घालण्याचा प्रकार केंद्राच्या धोरणातून होत आहे.

कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा दर हा २१०५ रुपये होता. तर मंगळवारी दिल्लीतून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यासाठी ‘नाफेड’ कांदा खरेदीचा दर २५५५ रुपये प्रति क्विंटल इतका ठरवला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल २,८०० ते ३००० पर्यंत दर मिळत आहे. संरक्षित साठा (बफर स्टॉक) साठी कांदा खरेदीचे दर; मात्र बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व एनसीसीएफला कांदा दिला जाणार नाही.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com