
Market Bulletin:
कांद्याचे भाव टिकून
देशातील बाजारात कांद्याच्या भावातही चढ उतार सुरुच आहेत. बाजारातील आवक वाढल्याने कांदा भाव मागील ४ दिवसांमध्ये काहीसे नरमले आहेत. मात्र अजूनही कांदा आवकेचा दबाव वाढलेला नाही. कांद्याची आवक तुलनेत स्थिर दिसत आहे. कांद्याला उठावही चांगला मिळत आहे. त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव १७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ज्वारी दबावातच
बाजारात ज्वारीला मागील गेल्या काही महिन्यांपासून कमीच भाव मिळत आहे. बाजारातील ज्वारीची आवक कमीच आहे. मात्र खरिपातील वाढलेले उत्पादन आणि रब्बीतही चांगल्या उत्पादनाचा अंदाज, यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव दिसून येत आहे. देशातील महत्वाच्या बाजारात सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. रब्बीतील ज्वारीची लागवड वाढली आहे. मात्र वाढती उष्णतेचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ज्वारीच्या दरावरही परिणाम दिसेल, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गव्हाचे दर तेजीतच
देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्याने सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असूनही गव्हाच्या भावात मागील महिनाभरात ३ टक्क्यांची वाढ झाली. गव्हाचा भाव देशभरात सरासरी ३२०० ते ३३०० रुपयांवर पोचला. गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील. पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत आले होते. तर सोयापेंडचे वायदे २९६ डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३३० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस स्थिरावला
कापसाचा बाजारभाव कमीच आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी सीसीआयला जास्त कापूस देत आहेत. त्यामुळे सीसीआयची खरेदी वाढत आहे. तर खुल्या बाजारात सध्या कापूस ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांनी विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक कमी होणार असली तरी सरासरीएवढी राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चनंतर आवकेत घट होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.कापूस स्थिरावला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.