Agriculture Commodity Market : कापूस, मका, तूर, हरभऱ्याच्या किमतींत घट

Soybean Rate : सोयाबीन वगैरे पिकांच्या वायदे बाजारावर घालण्यात आलेली बंदी ३१ जानेवारीनंतर उठवली जाईल अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. ती आता ३१ मार्चपर्यंत चालू राहील, असे सेबीने जाहीर केले आहे.
Agriculture Commodity Market Update
Maize CottonAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- २५ ते ३१ जानेवारी २०२५

सोयाबीन वगैरे पिकांच्या वायदे बाजारावर घालण्यात आलेली बंदी ३१ जानेवारीनंतर उठवली जाईल अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. ती आता ३१ मार्चपर्यंत चालू राहील, असे सेबीने जाहीर केले आहे. आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षणे किंवा अंदाजपत्रातील तरतुदी यामुळे पिकांच्या किमतींवर नजीकच्या काळात काही परिणाम होईल अशी शक्यता दिसत नाही.

३ फेब्रुवारीपासून NCDEX मध्ये मक्याचे जून डिलिव्हरीसाठी, हळदीचे ऑगस्ट डिलिव्हरीसाठी व कपाशीचे फेब्रुवारी २०२६ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. तुरीची आवक वाढती आहे. इतर पिकांची आवक कमी होऊ लागली आहे.

या सप्ताहात सोयाबीनच्या किमती काही प्रमाणात वाढल्या. परंतु त्या अजूनही हमीभावापेक्षा कमीच आहेत. कांदा व टोमॅटो यांच्या किमतीत सुद्धा वाढ झाली. इतर शेतीमालाच्या किमती कमी झाल्या. ३१ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस / कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहातसुद्धा १ टक्का घसरून रु. ५३,०४० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव १.९ टक्क्याने घसरून रु. ५३,५९० वर आले आहेत. मे भाव रु. ५५,४०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत.

सध्या तरी स्पॉट भावाने विकणे योग्य ठरेल. NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु. १,३९० वर आले आहेत.

फेब्रुवारी फ्यूचर्स २ टक्क्यांनी वाढून रु. १,४५८ वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,४५९ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. २,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर (रु. २,४००) आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती ०.७ टक्क्याने घसरून रु. २,३९५ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स रु. २,४०८ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ०.३ टक्का अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी घसरून रु. १३,३३६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमतीसुद्धा ३.२ टक्क्यांनी घसरून रु. १३,३४८ वर आल्या आहेत. मे किमती रु. १३,१५४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.४ टक्क्याने कमी आहेत.

Agriculture Commodity Market Update
Chana Procurement : शासकीय हरभरा खरेदीची ३० केंद्रे शक्य

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,१०० वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या पुन्हा २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,९५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. नवीन पिकाची आवक फेब्रुवारी मध्यास सुरू होईल.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,१०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

Agriculture Commodity Market Update
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची अपेक्षा

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.९ टक्का घसरून रु. ४,२५५ वर आली होती. या सप्ताहात ती १.५ टक्क्याने वाढून रु. ४,३१८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ५.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,८४२ वर आली होती. या सप्ताहात ती २.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,६८० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक या सप्ताहात वाढली आहे.

कांदा

कांद्याची किंमत (पिंपळगाव बसवंत) या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने वाढून रु. २,२०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. ७५० वर आली होती; या सप्ताहात ती रु. ८५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); (कपाशीची किंमत प्रति २० किलो)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com