Agrowon Podcast : जिऱ्याच्या वायद्यांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घट

Market Update : सध्या जिऱ्याचे वायदे २९ हजार ५६० रुपयांवर पोचले. दोन महिन्यांआधी हाच भाव जवळपास ६५ हजार रुपये होता.
Jeera
JeeraAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : नविन वर्षाच्या सुट्ट्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंंडचे वायदे सुरु झाले. पण आज पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत तरी आंतरराष्ट्रीय बाजाराने निराशाच केली. सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे नरमले होते. त्याचा परिणाम देशातील बाजारवरही दिसला.

प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव ४ हजार ८५० ते ४ हजार ९५० रुपयांवर्यंत काढले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी कायम होती. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आठवडाभर दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला आजही सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळी आणि देशातील बाजारात कापसाची आवक याचा परिणाम दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सुट्ट्यांनंतर आज बाजार सुरु झाल्यानंतर काहीशी वाढ दिसून आली होती. मात्र देशातील भाव कायम होते. देशातील वायदे २८० रुपयांनी कमी होऊन ५७ हजार ७०० रुपयांवर पोचले होते. देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाल्यानंतर बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Jeera
Agrowon Podcast : कांदा भाव स्थिरावला

जिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवड वाढल्याचा परिणाम दरावार दिसून आला. जिऱ्याचे वायदे जवळपास निम्म्याने कमी झाले. सध्या जिऱ्याचे वायदे २९ हजार ५६० रुपयांवर पोचले. दोन महिन्यांआधी हाच भाव जवळपास ६५ हजार रुपये होता.

तर बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला ३० हजार ते ३२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. नवा जिरा बाजारात येण्यास अजून वेळ आहे. पण उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे व्यापारी स्टाॅकमधील माल बाहेर काढत आहेत. याचा दबाव नवा माल बाजारात आल्यानंतरही कायम राहू शकतो, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Jeera
Agrowon Podcast : बाजारात सध्या हळदीला काय भाव मिळतोय?

कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबली आहे. कांद्याचा सरासरी भाव स्थिरावलेला दिसतो. तर काही बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी भाव वाढलेला दिसतो. तर दुसरीकडे बाजारातील कांदा आवक दिवसेंदिवस काहीशी कमी झालेली दिसते.

सध्या कांद्याला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील दोन आठवड्यानंतर लेट खरिपातील माल बाजारात सुरु होईल. त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो. त्यामुळे या काळात कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता जाणवत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.  

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. सरकारी धोरणांचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. सरकारने भारत ब्रॅंडखाली हरभरा डाळ विक्री सुरु केली. नाफेड, एनसीसीएफ, तसेच इतर सहकारी संस्था आणि रिटेल विक्री आऊलेट्समधून हरभरा डाळ ६० रुपये किलोने विकली जात आहे.

त्यामुळे खुल्या बाजारातील भावावर त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा भाव आता ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षाही अनेक बाजारात कमी भाव मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com