Market Bulletin: तूर दरात चढ-उतारराज्यातील तूर बाजारात आज आवक आणि दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. अकोला बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत ९१ क्विंटलने वाढून ६०४ क्विंटलवर पोहोचली. मात्र, सरासरी दरात २३० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव १० हजार २७० रुपये प्रति क्विंटल होता. तर दुधणी बाजारात आवक ६९ क्विंटलने घटून १८८ क्विंटल झाली. सरासरी दरात २६२ रुपयांची घसरण होऊन आज ९ हजार ६२० रुपये दर मिळाला. तसेच लातूर बाजारात आवक १३१ क्विंटलने घटून १४८ क्विंटल झाली. सरासरी दरात २०१ रुपयांची घसरण होऊन आजचा दर १० हजार रुपये प्रति क्विंटल होता..मक्याचे भाव स्थिरराज्यातील मका बाजारात आज दरांमध्ये काही ठिकाणी स्थिरता, तर काही ठिकाणी चढ-उतार पाहायला मिळाले. आज जामनेर बाजारात मक्याची आवक काहिश्या क्विंटलने घटून २ हजार ४० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर २ हजार १०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर, अमरावती बाजारात मक्याची आवक १ हजार १७४ क्विंटलने वाढून १ हजार ५०७ क्विंटल झाली. सरासरी दरात काहिशी वाढ होऊन आजचा दर २ हजार ८७५ रुपये होता. तसेच देवळा बाजारात मक्याची आवक ४३४ क्विंटलने वाढून १ हजार ८९ क्विंटल झाली. सरासरी दर २ हजार ९५० रुपयांवर कायम राहिल्याचे चित्र होते..Chana Market: हरभरा बाजारात तेजीचे वातावरण; आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात सुधारणा.भेंडीची आवक किंचीत वाढलीभेंडी बाजारात आज आवक आणि दरांमध्ये बदल दिसून आले. पुणे-मोशी बाजारात भेंडीची आवक ४१ क्विंटलने वाढून आज १३० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात २५० रुपयांची घसरण होऊन २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तर, मुरबाड बाजारात आवक ५ क्विंटलने वाढून ६९ क्विंटल झाली. त्याचबरोबर, सरासरी दरात ५०० रुपयांची घसरण होऊन २ हजार ५०० रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक किंचीत वाढून ३० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर ४ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता..Green Chili Price Drop : हिरवी मिरचीचे दर घसरले ११ हजारांवरून ११०० रुपयांवर.मेथीच्या दरात बदलमेथी बाजारात आज आवक आणि दरांमध्ये वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. पुणे-मोशी बाजारात मेथीची आवक ८०० नगांनी घटून १४ हजार २०० नग झाली. मात्र, सरासरी दर १३ रुपये प्रति नगावर स्थिर राहिला होता. तर, छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथी आवक ५०० नगांनी घटून १० हजार ५०० नग झाली. तर सरासरी दरात ५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ७ रुपये प्रति नग होता. तसेच श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक ९०० नगांनी घटून ५ हजार ५०० नग झाली. सरासरी दरात २ रुपयांची वाढ होऊन आज १० रुपये प्रति नग दर मिळाला..मोसंबीच्या दरात चढ-उतारमोसंबी बाजारात आज आवक आणि दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. नागपूर बाजारात मोसंबीची आवक ९३३ क्विंटलने वाढून १ हजार १९९ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात ६०० रुपयांची घसरण होऊन आज १ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल मिळाले. तर सांगली बाजारात आवक १८६ क्विंटलने वाढून ३१२ क्विंटल झाली. तर सरासरी दरात २५० रुपयांची वाढ होऊन ५ हजार रुपये दर मिळाला. तसेच नाशिक बाजारात आवक १४० क्विंटलने घटून १३० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर पाहायला मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.