Market Bulletinसोयाबीन दर तेजीतचआज कारंजा बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत १ हजार ५०० क्विंटलने वाढून ८ हजार क्विंटल झाली. मात्र, सोयाबीनचा सरासरी दर २५ रुपयांनी वाढून ६ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तर, अकोला बाजारात सोयाबीनची आवक ५८४ क्विंटलने घटून ५ हजार ३३६ क्विंटल झाली. या बाजारातील सरासरी दरात किंचीत वाढ होऊन आजचा दर ६ हजार ९९५ रुपये प्रति क्विंटल होता. तर, नागपूर बाजारात सोयाबीनची आवक ८८८ क्विंटलने घटून ४ हजार ५१९ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात १६२ रुपयांची वाढ होऊन तो ७ हजार १२ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला..गव्हाच्या दरात चढ-उतारआज उल्हासनगर बाजारात गव्हाची आवक कालच्या तुलनेत १२० क्विंटलने वाढून ६१० क्विंटल झाली. गव्हाचा सरासरी दर १०० रुपयांनी वाढून ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. नागपूर बाजारात गव्हाची आवक ७८ क्विंटलने वाढून ३०० क्विंटल झाली, तर सरासरी दर फक्त २७ रुपयांनी वाढून २ हजार ७७९ रुपये प्रति क्विंटल झाला. दुसरीकडे, कोल्हापूर-लक्ष्मीपुरी बाजारात गव्हाची आवक १११ क्विंटलने वाढून २८३ क्विंटल झाली. मात्र, या बाजारातील सरासरी दर स्थिर राहून ३ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलवर कायम होता..Orange Price: पुणे बाजारात नागपुरी संत्र्यांची आवक; क्रेटला १ हजार ४०० रुपयांपर्यंत दर.भेंडीच्या दरात बदलआज पेन बाजारात भेंडीची आवक कालच्या तुलनेत ५७ क्विंटलने घटून ३४२ क्विंटल झाली. मात्र, भेंडीचा सरासरी दर स्थिर राहून आजचा दर ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. तर, पुणे-मोशी बाजारात भेंडीची आवक कालच्या तुलनेत काहिश्या क्विंटलने घटून १४३ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात २५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, नागपूर बाजारात भेंडीची आवक कालच्या तुलनेत ३० क्विंटलने वाढून आज ११० क्विंटल झाली. सरासरी दर कालसारखाच आजही १ हजार ३७५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता..Maharashtra Soybean Production: महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादनात ३३ टक्के घट; ‘सोपा’चा अंदाज.लसणाच्या आवकेत वाढआज नागपूर बाजारात लसणाची आवक कालच्या तुलनेत २८० क्विंटलने वाढून ५६० क्विंटल झाली. मात्र, लसणाचा सरासरी दर शनिवारसारखाच स्थिर राहून १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. तर, सांगली-फळे भाजीपाला बाजारात लसणाची आवक कालच्या तुलनेत १० क्विंटलने वाढून १३० क्विंटल झाली. बाजारातील सरासरी दरही शनिवारसारखेच आजही स्थिर राहून १४ हजार रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, अकोला बाजारात लसणाची आवक शनिवारच्या तुलनेत ९० क्विंटलने वाढून १२० क्विंटल झाली. सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवरून वाढून १४ हजार रुपये प्रति क्विंटल झाला..पपईच्या दरात नरमाईआज छत्रपती संभाजीनगर बाजारात पपईची आवक कालच्या तुलनेत किंचीत घटून २७ क्विंटल झाली. पपईचा सरासरी दर १ हजार २०० रुपयांनी घसरून २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलवर आला होता. तर,पुणे-मोशी बाजारात पपईची आवक कालच्या तुलनेत २० क्विंटलने घटून २५ क्विंटल झाली. या बाजारातील सरासरी दर २५० रुपयांनी घसरून आजचा दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, नाशिक बाजारात पपईची आवक कालच्या तुलनेत १० क्विंटलने घटून आज २० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर कालसारखेच आजही स्थिर राहून २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.