Agriculture Market Bulletin: सोयाबीन दरात वाढराज्यातील सोयाबीन बाजारातील आज आवकेत चढ-उतार पाहायला मिळाले. लातूर बाजारात ८ हजार ४७४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, सरासरी दरात २० रुपयांची वाढ होऊन आज ७ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. उदगीर बाजारात ५ हजार ३०० क्विंटल आवक नोंदवण्यात आली. येथे सरासरी दरात १५९ रुपयांची वाढ होऊन तो ७ हजार ५९९ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तर, अकोला बाजारात २ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, सरासरी दरात २५० रुपयांची वाढ होऊन आज ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला. एकूणच पाहता, लातूर, उदगीर आणि अकोला या तिन्ही बाजारपेठांमध्ये सोयाबीनच्या सरासरी दरात वाढ झाल्याचे चित्र होते..कांदा दरात सुधारणाराज्यातील कांदा बाजारात आज आवक घटल्याने काही बाजारांतील दरात सुधारणा पाहायला मिळाली. कोल्हापूर बाजारात ५ हजार २० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी दर कालप्रमाणेच आजही ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला होता. पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळी कांद्याची आवक २ हजार ७३२ क्विंटलने कमी झाली असून आज २ हजार ८५० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन तो ४ हजार ३५० रुपयांवर पोहोचला. तर मालेगाव-मुंगसे बाजारात २ हजार ६५० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. बाजारातील सरासरी दरात आज १ हजार ५६० रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, कांद्याला आज ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला..Tur Price Increase: तुरीने ओलांडला दहा हजारांचा टप्पा.पालक आवक वाढलीराज्यातील पालक बाजारात आज दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर बाजारात पालकाची १३ हजार नग आवक झाली असून, सरासरी दरात फक्त ७५ पैशांची घसरण होऊन आज ३ रुपये ७५ पैसे प्रति नग भाव मिळाला. पुणे-मोशी बाजारात लोकल पालकच्या आवकेत ७०० नगांची वाढ होऊन ४ हजार ८०० नग आवक नोंदवण्यात आली. येथे सरासरी दर १० रुपये प्रति नग स्थिर राहिला. तर खेड-चाकण बाजारात पालकाची आवक १ हजार ९८४ नगांनी वाढून ४ हजार ५८४ नगांवर पोहोचली. या बाजारात सरासरी दरात २०० रुपयांची वाढ होऊन १ हजार रुपये प्रति नग भाव मिळाला. एकूणच पाहता, छत्रपती संभाजीनगर बाजारात दरात घसरण, खेड-चाकणमध्ये वाढ, तर पुणे-मोशी बाजारात दर स्थिर राहिल्याचे चित्र होते..Agrowon Podcast: तूर, मोसंबीच्या दरात चढ-उतार, मक्याचे भाव स्थिर, भेंडीच्या आवकेत किंचीत वाढ तर मेथीच्या दरात बदल.फ्लॉवर दरात चढ-उतारसोलापूर बाजारात फ्लॉवरची आवक कालच्या ६ हजार ३०६ नगांवरून वाढून आज ८ हजार ५८७ नगांवर पोहोचली होती. आवक वाढूनही सर्वसाधारण दर कालच्याप्रमाणेच ८ रुपये प्रति किलोवर स्थिर होते. तर पुणे-मोशी बाजार समितीतही फ्लॉवर आवक कालपेक्षा ४८ क्विंटलने वाढून आज ४९३ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर कालच्याप्रमाणेच ७५० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. तसेच, नागपूर बाजारात फ्लावरची आवक कालच्या ४०० क्विंटलवरून घटून आज ३५० क्विंटल झाली, तसेच सर्वसाधारण दरात ५० रुपयांची घसरण होऊन आज १ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला..चिकूचे भाव कायमराज्यातील चिकू बाजारात आज आवकेत काहिसे बदल पाहायला मिळाले. नागपूर बाजारात लोकल चिकूची २२१ क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर कालसारखाच आजही २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला होता. सोलापूर बाजारात चिकूची आवक ३१ क्विंटलने वाढून आज ४६ क्विंटल नोंदवण्यात आली. मात्र, सरासरी दर ३ हजार ५०० रुपयांवर कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. तर पुणे-मोशी बाजारात चिकूची आवक किंचीत वाढून आज २० क्विंटल झाली असून सरासरी दर ५ हजार रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला. एकूणच आजच्या कांदा बाजारात सरासरी दरांच्या बाबतीत स्थिर स्थिती कायम राहिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.