Market Bulletin: मूग बाजारात चढ-उतारराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी आज पुणे बाजारात हिरव्या मुगाची आवक कालच्या तुलनेत ४ क्विंटलने घटून ४१ क्विंटल झाली होती. सरासरी दरात १०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ९ हजार २५० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तर, मुरुम बाजारात मुगाची आवक ४१ क्विंटलने घटून आज २९ क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा दर ९ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर होता. तसेच, मुखेड बाजारात मूग आवक किंचीत वाढून आज ९ क्विंटल होती, तर सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ९ हजार रुपये प्रति क्विंटल राहिला..कांदा दरात बदलआज मनमाड बाजारात उन्हाळी कांद्याची आवक परवाच्या तुलनेत १ हजार ५०० क्विंटलने वाढून ३ हजार ५०० क्विंटल झाला. मात्र, सरासरी दरात १०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, येवला बाजारात कांद्याची आवक ३ हजार क्विंटलवर स्थिर राहिली, मात्र सरासरी दरात १२५ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात हीच आवक २ हजार २४ क्विंटलने घटून आज २ हजार ५११ क्विंटल झाली, तर सरासरी दरात १५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ३ हजार २५० रुपये प्रति क्विंटल होता..Red Chilli Market: नंदुरबारात ओल्या लाल मिरचीची आवक सुरू.कोबीच्या आवकेत चढ-उतारनागपूर बाजारात कोबीची आवक कालच्या तुलनेत ४० क्विंटलने वाढून ६४० क्विंटल झाली. सरासरी दरात ५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर १ हजार १५० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, चंद्रपूर-गंजवड बाजारात आवक काहिशी घटून आज ५५ क्विंटल झाली आणि सरासरी दरात २०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर १ हजार रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात कोबीची आवक ५८ क्विंटलने घटून आज ५४ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात २०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ७५० रुपये प्रति क्विंटल झाला..Raisin Price: बेदाणा दर टिकून; मागणी कमी.कोथिंबिरीच्या दरात घसरणआज नागपूर बाजारात कोथिंबिरीची आवक गुरुवार सारखीच आजही ३३० क्विंटलवर स्थिर राहिली होती. मात्र, सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन आजचा दर ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटल होता. तर, भुसावळ बाजारात कोथिंबिरची आवक २ क्विंटलने घटून आज २९ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा दर २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला..डाळिंब दर तेजीतसांगोला बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत ११७ क्विंटलने घटून आज ५२२ क्विंटल झाली. सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन आजचा दर १० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, पिंपळगाव बसवंत बाजारात डाळिंबाची आवक कालपेक्षा ३१ क्विंटलने घटून आज १८२ क्विंटल होती. मात्र सरासरी दरात १ हजार रुपयांची वाढ होऊन आजचा दर ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.