Market Bulletin: हरभरा आवक कायमराज्यातील प्रमुख बाजार समितीतील अमरावती बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत ५८ क्विंटलने वाढून आज १ हजार १३० क्विंटल झाली होती. सरासरी दरात २५ रुपयांची घसरण होऊन आजचा दर ६ हजार ६२ रुपये प्रति क्विंटल होता. तर, नागपूर बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत १७२ क्विंटलने वाढून आज ५७९ क्विंटल झाली होती. सरासरी दरात २ रुपयांची घसरण होऊन आजचा दर ६ हजार ८२ रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, मुर्तीजापूर बाजारात हरभऱ्याची आवक ३०० क्विंटलवर स्थिर होती. सरासरी दरात ३५ रुपयांची वाढ होऊन आजचा दर ६ हजार ९५ रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..कांद्याच्या भावात वाढआज पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याची आवक कालच्या तुलनेत ११ हजार ३०८ क्विंटलने वाढून आज ८ हजार ८०० क्विंटल झाली होती. सरासरी दरात ५२ रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल होता. तर, येवला बाजारात कांद्याची आवक सोमवारच्या तुलनेत ९७४ क्विंटलने घटून आज ७ हजार क्विंटल झाली होती. सरासरी दरात ५०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तसेच, लासलगाव-विंचूर बाजारात कांद्याची आवक कालच्या तुलनेत ३ हजार १६५ क्विंटलने घटून आज ४ हजार ५०० क्विंटल झाली होती. सरासरी दरात ७५ रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल होता..India Rice Export: भारतीय बिगर बासमती तांदूळ निर्यातीत ५ टक्के वाढ; बासमती तांदळाच्या निर्यातीत ५ टक्के घट.मेथी बाजारात चढ-उतारराज्यातील छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत ३ हजार ५०० नगांनी वाढून आज १४ हजार ५०० नग झाली होती. सरासरी दरात ५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ७.५० रुपये प्रति नग झाला. तर, खेड-चाकण बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत ८ हजार ४२६ नगांनी घटून आज १० हजार १५४ नग झाली होती. सरासरी दरात ३०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर १० रुपये प्रति नग पाहायला मिळाला. तसेच, श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक सोमवारच्या तुलनेत ६०० नगांनी वाढून आज ६ हजार २०० नग झाली होती. सरासरी दरात २ रुपयांची घसरण होऊन आजचा दर ११ रुपये प्रति नग झाला..Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात बदल, गहू दर कायम, कोबी दरात वाढ, कोथिंबिरच्या भावात चढ-उतार तर लिंबू आवकेत वाढ.शेवगा दरात बदलआज छत्रपती संभाजीनगर बाजारात शेवग्याची आवक कालच्या तुलनेत ३ क्विंटलने घटून आज २९ क्विंटल झाली होती. सरासरी दरात २०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल होता. तर, खेड-चाकण बाजारात शेवग्याची आवक कालच्या तुलनेत ३४ क्विंटलने वाढून आज ६२ क्विंटल झाली होती. सरासरी दरात कोणताही बदल झाला नसून आजचा दर कालप्रमाणेच ४ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तसेच, श्रीरामपूर बाजारात शेवग्याची आवक आज १६ क्विंटल होती. सरासरी दरात २५० रुपयांची घसरण होऊन आजचा दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता..पपईच्या दरात वाढअमरावती फळ बाजारात पपईची आवक कालच्या तुलनेत २५ क्विंटलने घटून आज ११० क्विंटल झाली होती. सरासरी दरात २५० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल होता. तर, पुणे बाजारात पपईची आवक कालच्या तुलनेत १०७ क्विंटलने वाढून आज ४०१ क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दरात ६०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर २ हजार रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.