Market Bulletin: हरभरा दरात चढ-उतारराज्यातील हरभरा बाजारात आज आवक आणि दरांमध्ये चढ-उताराचे चित्र पाहायला मिळाले. अकोला बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत ११४ क्विंटलने वाढून ३५९ क्विंटलवर पोहोचली होती. तर सरासरी दरात ३०० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर, अमरावती बाजारात आवक १४ क्विंटलने घटून १८७ क्विंटल झाली, तर सरासरी दरात १६२ रुपयांची घट होऊन ७ हजार रुपये मिळाले. तसेच मुर्तीजापूर बाजारात आवक ३० क्विंटलने वाढून १३० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात १३५ रुपयांची घट होऊन आजचा दर ७ हजार २२० रुपये प्रति क्विंटल होता..आल्याच्या बाजारात बदलआल्याच्या बाजारात आज आवक आणि दरांमध्ये बदल पाहायला मिळाले. नागपूर बाजारात आल्याची आवक गुरुवारच्या तुलनेत २४० क्विंटलने घटून ४८० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा भाव ६ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल कायम राहिला. खेड-चाकण बाजारात आवक १५ क्विंटलने वाढून १७५ क्विंटल झाली, तर सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन ५ हजार रुपये मिळाले. तसेच अमरावती फळ आणि भाजीपाला बाजारात आल्याची आवक ७७ क्विंटलवर स्थिर राहिली. सरासरी दरात ५०० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव ६ हजार रुपये प्रति क्विंटल होता.Sugar Quota: नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३ लाख टन साखर कोटा जाहीर; साखर कारखान्यांना दिलासा.कोबी आवकेत वाढआज कोबी बाजारात बहुतांश ठिकाणी आवकेत वाढ पाहायला मिळाली. पुणे-मोशी बाजारात कोबीची आवक कालच्या तुलनेत १४६ क्विंटलने वाढून ३०१ क्विंटल झाली, तर सरासरी दरात १०० रुपयांची घसरण होऊन ७५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर, कोल्हापूर बाजारात कोबीची आवक १३३ क्विंटलने वाढून आज २८६ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात कोणताही बदल न होता आजचा भाव ८०० रुपयांवर कायम होता. दुसरीकडे सोलापूर बाजारात आवक १० क्विंटलने वाढून ११८ क्विंटल झाली. सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव ५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता..Cotton Price Decline: कापूस दरावर आयातीचा दबाव ५०० ते ६०० रुपयांची घसरण.कोथिंबिरीच्या दरात चढ-उतारकोथिंबीर बाजारात आज आवकेत वाढ, तर काही बाजारांमध्ये दरात घसरण पाहायला मिळाली. खेड-चाकण बाजारात कोथिंबिरीची आवक कालच्या तुलनेत ९ हजार ४९ नगांनी वाढून आज २४ हजार ७८९ नगांवर पोहोचली. मात्र, सरासरी दरात ३०० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव १२ रुपये प्रति नग होता. तर, सोलापूर बाजारात कोथिंबीरची आवक १ हजार १३६ नगांनी वाढून आज १२ हजार ४२४ नग झाली. मात्र, सरासरी दर ८ रुपये प्रति नगावर कायम राहिला होता. तसेच पाटण बाजारात कोथिंबिरीची आवक १३ हजार ५०० नगांवर स्थिर राहिली. सरासरी दरातही कोणताही बदल न होता १२ रुपये प्रति नग भाव मिळाला..डाळिंब आवकेत चढ-उतारराज्यातील डाळिंब बाजारात आज काही ठिकाणी दरात वाढ, तर काही बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोलापूर बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत ३१८ क्विंटलने वाढून १ हजार ८४ क्विंटल झाली. तर सरासरी दरात ५०० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. सांगोला बाजारात आवक १२० क्विंटलने वाढून ५४० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात १ हजार रुपयांची घट होऊन १० हजार ५०० रुपये मिळाले. तसेच अकलूज बाजारात डाळिंबाची आवक ११४ क्विंटलने घटून ३४७ क्विंटल झाली. सरासरी दरात १ हजार ९०० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव १३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.