हरभरा दरात चढ-उतारराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी अकोला बाजारात आज लोकल हरभऱ्याची ४९८ क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर शनिवारीच्या ६ हजार ६५ रुपयांवरून घसरून आज ६ हजार ३५ रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर, पुणे बाजारात आज हरभऱ्याची ४४ क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर शनिवारीच्या ६ हजार ६०० रुपयांवरून वाढून आज ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल झाला होता..ज्वारीच्या आवकेत घटपुणे बाजारात आज मालदांडी ज्वारीची ७४१ क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर शनिवारीप्रमाणेच आजही ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला होता. तर, कोल्हापूर-लक्ष्मीपुरी बाजारात आज ज्वारीची १४३ क्विंटल आवक होती. सरासरी दर शनिवारीच्या ४ हजार ९५० रुपयांवरून वाढून आज ५ हजार २५ रुपये प्रति क्विंटल झाला होता..Soybean Sowing: सोयाबीन लागवड ९० टक्क्यांवर.वांगी दरात चढ-उतारआज राज्यातील बाजार समितीतील वांग्याच्या आवकेत बदल पाहायला मिळाले.पेन बाजारात आज लोकल वांग्याची ३३३ क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर शनिवारीच्या ३ हजार ६०० रुपयांवरून वाढून आज ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर, पुणे-मोशी बाजारात लोकल वांग्याची आज १२५ क्विंटल आवक होती. सरासरी दर कालच्या ४ हजार ५०० रुपयांवरून घसरून आज १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच, अकलूज बाजारात लोकल वांग्याची आज २२ क्विंटल आवक झाली होती. सरासरी दर कालच्या २ हजार रुपयांवरून वाढून आज २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाला होता..Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, कांदा आवकेत बदल, बटाटा दर टिकून, मेथीचे दरात चढ-उतार तर मोसंबी दरात स्थिरता.शेपू दरात स्थिरताराज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज शेपूची आवक चांगली झाली होती. श्रीरामपूर बाजारात शेपूची ७ हजार १०० नग आवक झाली होती. सरासरी दर कालप्रमाणेच आजही १२ रुपये प्रति नग स्थिर राहिला होता. तर, अकलूज बाजारात लोकल व हायब्रीड शेपूची मिळून ५ हजार ७०० नग आवक झाली होती. सरासरी दरही १४ रुपये प्रति नगावर स्थिर होता. तसेच, पुणे-पिंपरी बाजारात लोकल शेपूची १ हजार ७५० नग आवक झाली होती. या बाजारात शेपूला सरासरी ९ रुपये प्रति नग दर मिळाला होता..केळीच्या आवकेत घटयावल बाजारात क्रमांक १ केळीची आवक आज २ हजार ४० क्विंटल झाली होती. सरासरी दर कालच्या २ हजार १५० रुपयांच्या तुलनेत वाढून आज २ हजार २६० रुपये प्रति क्विंटल झाला होता. तर, पुणे-मोशी बाजारात लोकल केळीची आवक आज ४३ क्विंटल झाली होती. या बाजारात सरासरी दर कालप्रमाणेच आजही ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.