Daily Market Bulletin: सोयाबीन दर टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात मागील महिन्याभरात चांगली वाढ झाली आहे. सध्या राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. सोयापेंडचा उठाव टिकून आहे. त्यामुळे सोयाबीन दरातील सुधारणा टिकून आहे. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदी दरात ५० रुपयांची वाढ केली आहे.प्रक्रिया प्लांट्सने आज ७ हजार ५५० ते ७ हजार ७५० रुपये दराने खरेदीचे व्यवहार केले आहेत. तर राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनचे भाव काही दिवस टिकून राहू शकतात, अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..कापूस बाजारात आवक कमीचसध्या देशातील कापूस बाजारात आवक कमीच आहे. कापसाला मागील काही आठवड्यात मागणी स्थिर झाली आहे. त्यामुळे कापसाचे दरही स्थिर दिसत आहेत. तर उठाव मात्र कायम आहे. त्यामुळे कापूस बाजारातील दर सुधारणा टिकून आहे. राज्यातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काही बाजारात कापसाचे व्यवहार ९ हजार ३०० पर्यंत होत आहे. परंतु सर्वच मालाला हा दर मिळत नाही. थोडेच व्यवहार या दराने होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, कापड उद्योगाकडून असलेली मागणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. त्यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळत आहे. कापसाचे भाव पुढील काही दिवसांत टिकून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Mango Canning Price: सिंधुदुर्गात कॅनिंगच्या आंबा खरेदी दरात मोठी घसरण.हरभरा दर स्थिरदेशातील हरभरा बाजारात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. राज्यातील बाजारात हरभरा आवक कमीच आहे. भावपातळी हमीभावाच्या खालीच आहे. राज्यातील प्रमुख बाजारात हरभऱ्याची आवक २५ ते ३० हजार क्विंटलपर्यंत होत आहे. हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबली आहे. चालू आठवड्यात हरभरा दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. परंतु बहुतांश बाजारात भावपातळी हमीभावाच्या खालीच आहे. प्रमुख बाजारात हरभऱ्याला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० चा दर मिळत आहे. देशातील कडधान्य आयातीच्या लोंढा आणि यंदाच्या रब्बी हंगामातील चांगल्या उत्पादनावर हरभरा दरावर दबाव आहेत. पुढील काही दिवस हरभरा दर स्थिर राहतील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी वर्तवला आहे..Soymeal Export Low: दरवाढीमुळे सोयापेंड निर्यात निम्म्याने घटणार; उद्योगांचा अंदाज.कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावात आहे. कांद्याला मागील दोन महिन्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर येत आहे. राज्यातील बाजारात काल दीड ते दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली आहे. सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर उष्णता आणि पूर्वमोसमी पावसामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे. कांद्याचा प्रश्न आणखी बिकट झाला आहे. कांदा बाजारावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..वांगी आवक स्थिरराज्यातील बाजारात वांग्याला सध्या चांगला उठाव मिळत आहे. लग्न सराईच्या काळात वांग्याला मागणी होती. यामुळे बाजारात वांग्याचे भाव टिकून होते. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बाजारात वांग्याची आवक काहिशी चांगली आहे. या बाजारांमध्ये वांगी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. तर अकलूज बाजारात भाव ३ हजारांच्याही पुढे दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारातील वांगी आवक काहीशी कमी होऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.