Cotton Market : कापूस बाजारातील सुधारणा कायम

Cotton Rate : कापसाला चांगली मागणी असल्याने कापसाचे भाव यापुढील काळातही कायम राहतील. तसेच बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरात आणखी वाढ होईल.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कांद्याच्या भावात सुधारणा दिसून आली. कांद्याचे भाव क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढले. सरासरी भाव १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

मात्र निर्यातबंदी मागे घेतल्याची अधिसूचना सरकारने अद्यापही काढली नाही. पण सरकारच्या घोषणेचा बाजाराला फायदा झाला. दुसरीकडे बाजारातील कांदा आवक टिकून आहे. तसेच कांदा भावातील ही सुधारणा टिकून राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा आधार कापूस बाजाराला मिळत आहे. देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोचला.

तर सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाला चांगली मागणी असल्याने कापसाचे भाव यापुढील काळातही कायम राहतील. तसेच बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरात आणखी वाढ होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton
Cotton Market : कापूस बाजारपेठेत ‘कस्तुरी ब्रॅण्ड’चा प्रवेश

देशातील बाजारात तुरीचा भाव तेजीतच आहे. बाजारात नव्या मालाची आवक वाढत आहे. पण व्यापारी आणि उद्योगांना अपेक्षित आवक होत नाही. शेतकरीही चांगल्या भावाच्या अपेक्षेने माल मागे ठेवत असल्याचे दिसते.

परिणामी तुरीचे भाव सरासरी ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील बाजारात आवक कमी आहेच. शिवाय आयातही घटलेली दिसते. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी यापुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton
Cotton Rate: कापसाला आज काय दर मिळाला?

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. त्यामुळे देशातील बाजारावरही दबाव कायम आहे. देशातील बाजारात आज दीड लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक झाली होती.

तर बाजारभाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीचे भाव सध्या टिकून आहेत. नव्या मालाची आवक सुरु होण्याच्या ऐन काळातही भाव तेजीतच दिसतात. त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारातील कमी असलेली आवक. तसेच मागील हंगामातील शिल्लक स्टाॅकही कमी आहे.

नव्या मालाचे उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे. या कारणांमुळे हळदीचे भाव सध्या १२ हजार ते २१ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीप्रमाणे भाव मिळत आहे. यंदा उत्पादनातही घट येणार असल्याने हळदीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com