Banana Rate : केळी दरात आठवड्यात टनास तीन हजार रुपयांनी वाढ

Banana Market : राज्यात केळीच्या दराने गेल्‍या आठ दिवसांतच टनास सरासरी तीन हजार रुपयांनी उसळी घेतली आहे.
Banana Rate
Banana RateAgrowon

Kolhapur News : राज्यात केळीच्या दराने गेल्‍या आठ दिवसांतच टनास सरासरी तीन हजार रुपयांनी उसळी घेतली आहे. सध्या केळीचे दर स्थानिक बाजारात १२००० रुपये टनांवरून १५००० रुपयांहून अधिकवर झाले आहेत. सणासुदीच्या दिवसांमुळे केळीला मागणी वाढल्याने ही दरवाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर केळी खरेदीसाठी व्यापारी उत्पादकांच्या बांधावर येत असल्‍याचे चित्र आहे.

जळगावमध्ये अतिउष्‍णतेमुळे केळींचे नुकसान झाले तर केळीचा नवा पट्टा म्हणून पुढे आलेल्या सोलापूर जिल्ह्यातही वादळी पावसामुळे केळी बागा खराब झाल्या. यामुळे अनेक बाजारपेठांमध्ये केळीची आवक गेल्या आठवड्यामध्ये अचानक कमी झाली. याच दरम्यान वटपोर्णिमेचा सण आल्याने केळीला मागणी वाढली, परिणामी केळीच्या दरात वाढ झाल्‍याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Banana Rate
Banana Export : आखाती देशात सहाशे टन केळीची निर्यात

अवर्षणामुळे केळी लागवड कमी झाल्याने नजीकच्या काळात केळीच्या दरात वाढच होण्याची शक्यता आहे. रायपनिंग चेंबरमध्‍येही केळी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्‍याचे चित्र आहे. यामुळे रायपनिंग चेंबरधारक मिळेल तेथून केळीची खरेदी करत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश भागांत दुष्काळी परिस्थतीमुळे केळीची लागवड कमी झाली आहे. ज्या ठिकाणी पुरेसे पाणी आहे, तेथेच शेतकऱ्यांनी केळी लागवडीचे धाडस केले. गरजेइतके पाणी असले तरी रावेर पट्टयात तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्‍सिअसवर गेल्याने केळीची वाढ चांगली झाली नाही.

अनेक बागा रोगाला बळी पडल्या. यामुळे पाणी असूनही केळीची वाढ समाधानकारक झाली नाही. सोलापूर जिल्‍ह्यात उजनीच्या पाण्यामुळे बागायती झालेल्‍या काही गावांमध्ये गेल्‍या दोन-तीन वर्षांमध्ये केळी लागवड वाढली आहे. यंदा मे च्या उत्तरार्धात या भागात वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे केळी बागा आडव्या झाल्या. या सर्वांचा एकत्रित परिणाम केळीची टंचाई होण्‍यावर झाला.

Banana Rate
Banana Cultivation : खानदेशात मृग बहर केळी लागवड वाढण्याचे संकेत

वटपोर्णिमे दिवशी 'केळीबाणी'

वटपोर्णिमेदिवशी तर पश्चिम महाराष्‍ट्रातील अनेक बाजारपेठेत दुपारनंतर अक्षरशः केळी गायब झाल्यासारखे चित्र होते. कुठेच केळी मिळत नसल्‍याने व्यापाऱ्यांनी रायपनिंग चेंबर्सकडे धाव घेतली. तिथेही अनेक व्यापाऱ्यांना केळी मिळू शकली नाहीत. यादिवशी केळीचे दर नेहमीपेक्षा तिपटीने वाढल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या केळी दरात सरासरी टनाला तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांकडून दररोज केळीची चौकशी होत आहे. येत्या महिन्‍याभरात आषाढी एकादशी, श्रावण आदी उपवासाचे दिवस सुरू होणार असल्याने आतापासून केळीला मागणी वाढत आहे. माझी केळी श्रावणामध्ये सुरू होतील या केळीला टनास १९००० रुपयांपर्यंत दर देण्याची तयारी व्‍यापाऱ्यांची आहे. केळीला दरवाढ झाल्याने उत्पादकांसाठी समधानाची बाब आहे.
- राजू मंगसुळे, केळी उत्पादक, औरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
गेल्‍या काही दिवसांपासून रायपनिंग चेंबरमध्ये ठेवायला केळी उपलब्ध होत नाहीत. नव्या लागवडी नसल्याने एखाद्या गावात एखादाच केळी उत्पादक शेतकरी असेच चित्र आहे. येत्‍या काही दिवसांत केळीची मोठी चणचण भासेल असे वाटते.
- अविनाश पाटील, रायपनिंग चेंबरचालक, मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्‍हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com