Agrowon Podcast : देशात आज तुरीला कितीचा भाव मिळाला?

Tur Rate : तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
Tur
TurAgrowon

Market Bulletin : हळदीच्या बाजारात चांगली तेजी आली आहे. यंदा हळदीची लागवड कमी झाली होती. त्यातच हळदीच्या पिकाला कमी पाऊस, जास्त उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. आता हळद काढणी सुरु आहे. त्यामुळे उत्पादकतेतील घट पुढे येत आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावातही वाढ दिसून आली.

हळदीचा सरासरी भाव बाजार समित्यांमध्ये आता १३ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवरील भावपातळी १५ हजार ते १९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत ११.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ३३९ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक आजही कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे. याचा आधार देशातील बाजारालाही मिळण्याचा अंदाज आहे. 

Tur
Tur Productivity : तुरीची हेक्‍टरी उत्पादकता नऊ क्विंटलपेक्षा जास्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत काहीसे कमी होऊन ९४.६४ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील बाजारात कापसाचे भाव टिकून होते. कापसाला देशात प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर कापसाची आवकही कमीच आहे. यापुढच्या काळातही कापसाची आवक कमीच होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील वाढही कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur
Tur, Chana Arrival : अमरावती बाजार समितीत तूर-हरभऱ्याची आवक वाढली

तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम आहे.  तुरीचे भाव ऐन आवकेच्या हंगामातही टिकून आहे. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे.

परिणामी तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे भाव टिकून आहेत. सध्या देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुरु झाली. पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल. नवी आवक सुरु होण्यामुळे हरभऱ्याचा भाव आपल्या उच्चांकी ६ हजार ४०० रुपयांपासून नरमला आहे.

सध्या हरभऱ्याला ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com