Market Bulletin: कापूस स्थिरावलादेशातील बाजारात कापसाचा भाव आज स्थिरावला होता. अनेक बाजारांमधील कापसाची आवक कमी झालेली आहे. तसेच भाव कमी असल्यामुळे शेतकरी हमीभावाने कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. सरकारनेही कापूस खरेदीला मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार मिळाल्याने खुल्या बाजारातील दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणासोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली आहे. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीच्या तुलनेत कमी होती. सोयाबीनला उठावही काहीसा वाढत आहे. याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. पुढील काळातही सोयाबीनची आवक मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. सरकारकडे सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. सरकारच्या विक्रीकडेही बाजाराचे लक्ष आहे. त्यामुळे काही दिवस सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार वगळता भाव स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Wheat Crop: मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार.तुरीच्या भावावर दबावदेशातील बाजारात तुरीच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील तुरीची आवक चांगली सुरु आहे. बहुतांशी बाजारांमधील तुरीची आवक वाढलेली आहे. आवकेच्या दबावामुळे दरावरही दबाव वाढला आहे. सध्या देशातील बाजारात तूर ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आह. आवकेचा दबाव आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र मार्च महिन्यात आवकेचा दबाव कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातही वाढ होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Maize Procurement: मका हमीभाव खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ.अंजिराला उठावराज्यातील बाजारात अंजिराची आवक सुरु झाली आहे. मात्र आवकेचा दबाव आणखी वाढलेला नाही. तसेच अंजिराला मागणी चांगली आहे. यंदा अंजिर पिकाला बदलत्या वातावरणाचा चांगला फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अंजिराची आवक यंदा सरासरीच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या अंजिर ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे. अंजिराचा भाव आणखी काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकरी सांगत आहेत..गवारचे भाव तेजीतराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून गवारचे भाव तेजीतच आहेत. गवारला बाजारात मागणीही चांगली आहे. गवार उत्पादनालाही यंदा बदलत्या वातावरणाचाही फटका पिकाला बसत आहे. त्यातच लागवडही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने गवारच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गवारचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.