Market Bulletinकापूस दर स्थिरसध्या देशातील कापूस बाजारात आवक कमीच आहे. कापसाला मागील काही आठवड्यात मागणी स्थिर झाली आहे. त्यामुळे कापसाचे दरही स्थिर दिसत आहेत. तर उठाव मात्र कायम आहे. त्यामुळे कापूस बाजारातील दर सुधारणा टिकून आहे. राज्यातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर काही बाजारात कापसाचे दर विक्रमी १० हजारांवर पोहचले आहेत. परंतु सर्वच मालाला हा दर मिळत नाही. थोडेच व्यवहार या दराने होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. त्यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळत आहे. कापसाचे भाव पुढील काही दिवसांत टिकून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..सोयाबीन दरात चढ उतारदेशातील सोयाबीन बाजारात दरातील चढ-उतार सुरु आहेत. काल सोयाबीन बाजारात दरात काहीशी नरमाई दिसून आली होती. परंतु आज मात्र पुन्हा दरात काहीशी सुधारणा झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदी दरात १०० रुपयांची वाढ केली आहे. आज प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदीचे दर ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकरांनी व्यक्त केला आहे..Sugarcane FRP: थकीत ‘एफआरपी’ देण्यास सुरुवात.टोमॅटो दरात सुधारणाराज्यातील बाजारात मागील दोन ते तीन आठवड्यापासून टोमॅटोची आवक कमी झाली आहे. तर उठाव कायम आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख बाजारात टोमॅटोच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. यंदा उन्हाच्या चटक्याचा टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच अवकाळी पावसाने टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. सध्या अनेक भागातील तोडा कमी झाला आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजारात सरासरी १ हजार ७५० ते २ हजार २ हजार २५० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. टोमॅटोची आवक पुढील काळात कमीच राहू शकते. तर उठाव कायम राहू शकतो. त्यामुळे पुढील काळात टोमॅटो दरात सुधारणा टिकून राहील, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podacast: जांभूळ दर तेजीत; केळी-गहू दर स्थिर, तुरीचा दर घटलेला, तर कापूस दबावात.जांभळाचे दर टिकूनराज्यातील बाजारात जांभळाची आवक सुरु झाली आहे. आवकेचे प्रमाण कमी आहे. प्रमुख बाजारात आवक ३० क्विंटलपेक्षा आवक कमी आहे. परंतु बाजारात उठाव चांगला आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे. त्यामुळे प्रमुख बाजारात जांभळाचे दर टिकून आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात जांभळाला सरासरी प्रति क्विंटल २० ते २३ हजार रुपयांचा दर मिळत आहे. यंदा हवामानातील बदलामुळे जांभूळ उत्पादकांना फटका बसला. मोहराला फळधारणा कमीच झाली. त्यामुळे जांभूळ उत्पादक अडचणीत आले आहे. पुढील काळात जांभळाची आवक कमीच राहण्याचा अंदाज असून उठाव चांगला राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..हिरवी मिरची टिकूनराज्यातील बहुतांश बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी झाली आहे. तर गुणवत्तापूर्ण हिरव्या मिरचीला बाजारात चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत. राज्यातील प्रमुख बाजारात हिरव्या मिरचीला सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. मिरची पिकाला यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला. तसेच वाढत्या उष्णतेमुळे पिकावर परिणाम झाला. त्यामुळे मिरची उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावं लागलं. सध्या मिरचीचा तोडा कमी झाला आहे. त्यामुळे आवक कमी झाली. अधिक मासामुळे समारंभाची मागणी कमी झाली आहे. पुढील काळात मिरची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहतील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.