Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव रोज ५० ते १०० रुपयाने बदलत आहेत. तर बाजार समित्यांंमध्येही याचा परिणाम दिसत असला तरी सरासरी दरपातळी स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयाने विकले जात आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही मर्यादीत आहे. असे असले तरी चढ उतार दिसत आहे. काहीसे चढ उतार वगळता सोयाबीनचे सरासरी भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस भाव स्थिरदेशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. कापसाची आवकही मर्यादीत आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीचा सध्या बाजारावर परिणाम दिसत आहे. कापसाला सध्या उठाव कमी असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सीसीआयच्या कापूस विक्रीलाही कमी प्रतिसाद मिळत आहे. उद्योग गरजेप्रमाणेच खरेदी करत आहेत. पण सीसीआय भाव कमी करत नसल्याने बाजार टिकून आहे. सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. कापसाचे भाव पुढील काळात सीसीआयच्या विक्री दरानुसार बदलण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले..Indian Basmati Rice: पाच हजार टन भारतीय बासमतीची अमेरिकेतून ऑर्डर.गवारचा उठाव कायमराज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारचा भाव तेजीतच आहे. आजही राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये गवारची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात तूर गुणवत्तेनुसार सरासरी ६ हजार ते ७ हजाराने विकली जात आहे. राज्यातील अनेक भागात गवारचे पीक आहे. त्यामुळे पुढील काही काळ बाजारातील आवक कमीच राहून गवारचे भाव टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Watermelon Production: कलिंगड पिकाचे उत्पादन एकरी १० ते १२ टन .कोथिंबीरचे भाव स्थिरावलेबाजारातील कोथिंबीरची आवक वाढलेली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. कोथिंबीरला बाजारात उठावही चांगला आहे. मात्र वाढलेल्या आवकेमुळे भाव स्थिरावलेले आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमधील कोथिंबीरची आवक सध्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर कोथिंबीरला शेकडा ४०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. क्विंटलला गुणवत्तेप्रमाणे १ हजार ५०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कोथिंबीरची बाजारतील आवक पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..लसणाला उठावबाजारात लसणाची आवक काहीशी मंदावली आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. लसणाला सध्या चांगला उठाव आहे. लग्नसराई आणि समारंभामुळे मागणी वाढली आहे. तर यंदा लसणाचे उत्पादन कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक मंदावल्यानंतर दरातही वाढ दिसून आली. सध्या लसूण ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. लसणाची आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही स्थिरावू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.