Market Bulletin:कापूस टिकूनदेशातील बाजारात मागील ३ दिवसांपासून कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे. तर कापसाला चांगला उठाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव टिकून आहे. कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. कापसाचे वाढलेले भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात मागील २ दिवसांपासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार होत आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयाबीनला उठाव असल्याने भाव पातळी एका मर्यादेत कमी जास्त होत आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण.सरकी तेजीतदेशातील बाजारात मागील काही महीनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमधील वाढ कायम; कापूस दरात सुधारणा, गवार तेजीत, गव्हाची आवक वाढली तर डाळिंब तेजीत.खरबूजाला उठावखरबुजाला सध्या चांगला उठाव आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारातली खरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. पाऊस आणि गारपीटीचाही तडाखा खरबूज पिकाला बसला आहे. यामुळे खरबुजाच्या आवकेवर परिणाम होत आहे. सध्या बाजारात खरबूज प्रतिक्विंटल सरासरी १६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे खरबुजाला उठाव मिळत आहे. पुढील काळात खरबुजाला मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खरबुजाचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..टोमॅटो आवक टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून टोमटोचा भाव दबावात आहेत. बाजारातील आवक सध्या चांगली आहे. अनेक भागातील लागवडी वाढून सध्या तोडा चांगला निघत असल्याने बाजारात आवक वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवस टोमॅटोची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव दबावातच राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.