Market Bulletin: कापूस बाजारात तेजीदेशातील बाजारात कापसाच्या दरात मागील तीन दिवसांपासून तेजीचे वारे वाहू लागले आहे. कापसाची आवक कमी असून उठाव चांगला आहे. सीसीआयने कापूस विक्रीच्या दरात वाढ केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि पश्चिम आशियातील तणावाचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येत आहे. तसेच अमेरिकेच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात कमी पावसामुळे कापूस पिकाला फटका बसण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे देशातील बाजाराला आधार मिळत आहे. देशातील बाजारात कापसाचे दर विक्रमी दिशेने वाटचाल करत आहेत. राज्यातील बाजारात कापसाने प्रतिक्विंटल १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. वर्ध्यातील हिंगणघाट बाजारात कापसाला १० हजार रुपये दर मिळाला आहे. तर कापसाला सरासरी प्रति क्विंटल ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. पुढील काही दिवस कापूस बाजारातील तेजी टिकून राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे..सोयाबीन दर टिकूनदेशातील सोयाबीन बाजारात मागील तीन दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीन आवक सुधारली आहे. मात्र सोयाबीनला उठाव चांगला आहे. पोल्ट्री उद्योगाकडून सोयापेंडसाठी खरेदी वाढली आहे. तर सोयातेलाचे दर सुधारले आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे दर कायम ठेवले आहेत. प्लांट्सनी आज ६ हजार ३०० ते ६ हजार ८०० रुपयांचे दर दिले आहेत. त्यामुळे खुल्या बाजारातही सोयाबीनच्या दरातील वाढ टिकून आहे. बाजार समित्यांमध्ये आज ५ हजार ९०० ते ६ हजार ३०० रुपयांच्या दर सोयाबीनला दर मिळत आहे. सोयाबीन उद्योगाकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दराला आधार मिळाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सुरुवातीला सोयाबीनची विक्री केली आहे. पुढील काही दिवस सोयाबीन बाजारात सुधारणा टिकून राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: कांदा दरात सुधारणा; सोयाबीन दरात उसळी, कापसाला मागणीचा आधार, टोमॅटो आवक स्थिर तर जांभळाचे दर दबावात.ऊस एफआरपी जाहीरकेंद्र सरकारने २०२६-२७ च्या साखर हंगामासाठी रास्त व किफायतशीर दर अर्थात एफआरपी जाहीर केला केला आहे. २०२६-२७ साठी उसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ केली करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी उसाची एफआरपी ३६५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकार कृषी व किंमत आयोगाच्या शिफारशीवर आधारित एफआरपी जाहीर करतं. यंदाचा एफआरपी हा एफआरपी हा उत्पादन खर्चाच्या सुमारे २००.५ टक्के असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. तर या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांन एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु राज्यातील बहुतांश कारखाने साखरेचा उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या एकआरपीपेक्षा कमी दर देतात. त्यामुळे एफआरपी कागदावर राहतो, अशी टीका शेतकरी नेत्यांकडून केली जाते. एफआरपीतील वाढीमुळे साखर कारखान्यांचं कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल तसेच देशात यंदा अतिरिक्त उसापासून इथेनॉल निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वासही केंद्र सरकारने व्यक्त केला आहे..Kabuli Chana Price: काबुली हरभऱ्याला सरासरी ९००० रुपये प्रति क्विंटल दर.हिरव्या मिरची दरात चढ-उतारराज्यातील बाजारात हिरव्या मिरची दरात चढ-उतार सुरु आहेत. आवकही कमीच आहे. तर बाजारात हिरव्या मिरचीला उठाव टिकून आहे. लग्नसराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीची मागणी वाढली आहे. परंतु दरात चढ-उतार मात्र सुरु आहेत. सध्या हिरवी मिरची राज्यातील प्रमुख बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार ४ हजार ४०० दरम्यान विकली जात आहे. पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, सातारा आणि कोल्हापूर या भागात हिरव्या मिरचीची प्रामुख्याने लागवड केली जाते.काही भागात मिरचीचा तोडा सुरु आहे. उन्हाळ्यात अति उष्णतेचा मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे मिरची उत्पादकांची चिंता वाढली आहे. बाजारात मिरचीची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे मिरचीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत..हरभऱ्यावर दबावराज्यातील बाजार समितीमध्ये हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. तर आवक कमी आहे. मात्र रब्बी हंगामात हरभऱ्याचं चांगलं उत्पादन आणि आयातीच्या लोंढ्यामुळे हरभरा बाजारावर दबाव आहे. राज्यातील बाजारात हरभऱ्याला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ते २ हजार २०० रुपयांचं दरम्यान दर मिळत आहे. तर सरकारने हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सरकारची हमीभाव खरेदी २९ मे रोजी मुदत वाढीच्या अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे मागील आठवड्याभरात बाजारात आवक किंचित सुधारली होती. परंतु केंद्र सरकारने मंगळवारी अर्थात ५ मे रोजी राज्यातील हरभरा खरेदीला २९ मे पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा विक्री करावी, असे आवाहन बाजारातील अभ्यासक करत आहेत. तर पुढील काळातही हरभरा दरावर देशांतर्गत चांगलं उत्पादन आयाती लोंढ्यामुळे दर दबावात राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.