Market Bulletin :
सोयाबीनमध्ये सुधारणा
आज वायदे बाजाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी दुपारी १० डाॅलरच्या पुढे पोचले होते. सोयाबीनचे वायदे १०.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेलाचे वायदे ४०.५० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३१२ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन स्थिर होते. सोयाबीनला बाजारात आजही ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ४४५० ते ४६०० रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाचा भाव स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली पण देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापासाचे वायदे आज दुपारपर्यंत ७०.४५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५८ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावापतळीही आज कायम दिसली. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा आज स्थिरावला
राज्यातील बाजारात कांद्याचे भाव स्थिर होते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर मागील आठवडाभारात कांद्याच्या दरात चांगली सुधारणा झाली होती. राज्यात आजही हे भाव कायम दिसले. राज्यातील बहुतांशी भागात कांद्याची आवक कमीच होती. तर कांद्याचा भाव प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. काही बाजारांमध्ये कांद्याचा उचांकी भाव जास्त होता. पण हा भाव सर्वच बाजारांमध्ये मिळाला नाही. बाजारातील कांद्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किरकोळ चढ उतार वगळता कांद्याचे भाव कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली.
हरभऱ्यातील तेजी कायम
हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
गव्हाचा बाजार स्थिर
केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टाॅक लिमिट, बाजारात गव्हाची आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला. परिणामी गव्हाचे भाव उच्चांकावरून कमी होऊन स्थिरावले आहेत. आजही गव्हाला बाजारात सरासरी २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे. दुसरीकडे निर्यातबंदी कायम आहे. त्यामुळे बाजारावर दबाव. सरकारच्या धोरणांमुळे गव्हाचा बाजार आणखी काही महीने कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.