Cotton Rate : नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा 

Cotton Market : कापसाचा नवा हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर भावात मागील १५ दिवसांमध्ये ३ टक्क्यांची सुधारणा झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : कापसाचा नवा हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर भावात मागील १५ दिवसांमध्ये ३ टक्क्यांची सुधारणा झाली. देशात सध्या कापसाचा उपलब्ध असलेला साठा कमी झाला आहे. देशातील कापूस लागवड १० टक्क्यांनी कमी झाली. तर दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात पावसामुळे पिकाचे नुकसानही होत आहे. या कारणांमुळे सध्या बाजारात सुधारणा दिसत आहे.

आपला कापसाचा नवा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. सप्टेंबरपासूच उत्तरेतील राज्यांमध्ये कापसाची आवक सुर होईल. कारण या राज्यांमध्ये कापसाची लागवड लवकर सुरु होते. एरव्ही नव्या हंगामाच्या आधी म्हणजेच ऑफ सिझनमध्ये कापूस दरात सरासरीच्या तुलनेत जास्त दर दिसतात. नवा माल बाजारात सुरु होण्याच्या तोंडावर दरात नरमाई यायला सुरुवात होते. कारण बाजारात पुरवठा वाढणार असतो. 

Cotton Rate
Cotton Market: कापूस काहीसा सुधारला

यंदा मात्र ऐन ऑफ सिझनमध्येच विविध कारणांनी बाजार पडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात तर कापसाचे भाव गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते. देशातही कापसाच्या भावावर दबाव आला. पण आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे देशातील भाव कोसळले नाहीत. देशातील बाजार ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील भाव स्थिर राहण्याचे महत्वाचे कारण होते देशातील कमी झालेला पुरवठा. देशातील उत्पादन कमी राहील्याने देशात पुरवठा अतिरिक्त झाला नाही. परिणामी देशातील बाजारात भाव टिकून राहीले होते. 

गेले ३ महीने कापूस सतत दबावात राहील्याने नव्या हंगामाविषयी चिंता वाढली होती. कारण ऑफ सिझनमध्ये नेहमी भाव वाढतात पण यंदा भाव पडले होते. त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतात की काय? अशी भीती कायम होती. पण महत्वाच्या ३ कारणांनी देशात कापसाचे भाव वाढले. नव्या हंगामाच्या ऐन तोंडावर कापूस बाजारात झालेल्या वाढीमुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक झाली. मागच्या दोन आठवड्यांमध्ये कापसाच्या भावात सुधारणा होण्यासाठी प्रामुख्याने तीन कारणे आहेत. 

Cotton Rate
Cotton Cultivation : भारत वगळता जगभरात कापूस लागवड स्थिर

कापसाचा स्टाॅक कमी

सध्या देशात उपलब्ध असलेला कापसाचा स्टाॅक. गेल्या हंगामातील कापूस उत्पादनही कमीच राहीले. त्यातच देशातील उद्योगांचा वापर वाढला. निर्यातही २८ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. नव्या हंगामात यंदा केवळ २० लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. त्यातही जर पावसामुळे नव्या कापसाची बाजारातील आवक उशीरा सुरु झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात कापूस दरात सुधारणा होण्यास मदत झाली. 

लागवडीत घट

गेल्यावर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड तब्बल १० टक्क्यांनी कमी झाली. त्यातही उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील लागवड मोठ्या प्रमाणात घटली. गुजरात आणि महाराष्ट्रातही यंदा कापसाचे क्षेत्र घटलेले आहे. गेल्या हंगामात देशात कापसाची लागवड १२२ लाख हेक्टरवर होती. यंदा कापूस लागवड १११ लाख हेक्टरवरच स्थिरावली आहे. लागवड घटल्याने उत्पादनही कमी राहणार, यामुळे भावाला आधार मिळाला. 

पावसाचा तडाखा

मागच्या काही दिवसांमध्ये महत्वाच्या कापूस उत्पादक गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस झाला. यामुळे काही भागात कापूस पिकाचे नुकसान झाले. मध्य प्रदेशातही काही भागात ही स्थिती आहे. आधीच लागवड कमी आणि त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने बाजारावर त्याचे पडसाद उमटले. तसेच सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या काळात कापूस पीक पाते आणि बोंड मोठे होण्याच्या स्थितीत असतील. जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फटका कापूस पिकाला बसू शकतो. ही शक्यताही बाजाराने गृहीत धरली आहे. त्यामुळे दरात आतापासूनच सुधारणा दिसत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com