Market Bulletin: सोयाबीन स्थिरसोयाबीनचा बाजार आज स्थिर होता. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक कमीच आहे. लातूर बाजारात सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत कमी झाली होती. लातूर बाजारात आज २ हजार ९४३ क्विंटल आवक झाली होती. तर सरासरी भावपातळी १०० रुपयाने कमी होऊन ७ हजार रुपयांवर होती. मुर्तीजापूर बाजारात आवक वाढून १५० क्विंटलवर पोचली होती. तर सरासरी भाव वाढून ६ हजार ७०० रुपये होता. इतरही बाजारांमध्ये सोयाबीनला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. .कांद्यात चढ उतारराज्यातील बाजारात कांद्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांदा आवक शनिवारच्या तुलनेत वाढून २३ हजार क्विंटलवर पोचली होती. तर कमाल भावही वाढून २६९९ रुपये आणि सरासरी भावातही काहिशी वाढ होऊन १५६० रुपयांवर पोचला होता. कळवण बाजारातही आवक वाढून १८ हजार क्विंटल झाली होती. तर भावपातळी १२७५ रुपयांवर स्थिर होती. मुंबई बाजारात कांदा आवक वाढून १४ हजार क्विंटलवर पोचली होती. तर भावपातळी ५० रुपयाने कमी होूऊन १३५० रुपयांवर आली होती. अनेक बाजारांमधील सरासरी भावपातळीत काहीशी नरमाई दिसून आली होती. .Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा.शेवगा नरमलाशेवग्याचा बाजार चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काहीसा नरमला होता. अनेक बाजारांमध्ये शेवग्याला गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी भाव मिळाला होता. पुणे बाजारात शेवग्याची १९२ क्विंटल आवक झाली होती. शेवग्याला पुणे बाजारात कमाल ४५०० रुपये आणि सरासरी २ हजा ७५० रुपये भाव मिळाला होता. मुंबई बाजारातही आज १४८ क्विंटल शेवग्याची आवक झाली होती. तर शेवग्याला कमाल ६ हजार आणि सरासरी ५ हजारांचा भाव मिळाला. मुंबई बाजारात आज आवक कमी होऊन भाव वाढला होता. इतर बाजारांमधील आवकही कमी जास्त होऊन सरासरी भावपातळी ३ हजारांच्या दरम्यान दिसून आली होती. .Agriculture Development: शेतकरी हक्क, डिजिटल शेतीसह अन्नसुरक्षेवर भर: कृषिमंत्री चौहान.हरभरा भाव टिकूनराज्यातील बाजारांमध्ये हरभरा भावपातळी काहीशी स्थिर दिसून आली. लातूर बाजारात हरभऱ्याची १ हजार ४९५ क्विंटल आवक झाली होती. तर हरभऱ्याला कमाल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला होता. तर सरासरी भाव ५ हजार ६०० रुपये होता. मुर्तिजापूर बाजारात १८० क्विंटल आवक झाली होती. सरासरी भाव ५ हजार ९२० रुपये आणि कमाल भाव ५ हजार ९५५ रुपये होता. राज्यातील इतर बाजारांमध्ये हरभरा आवक काहिशी कमी झाली होती. तर सरासरी भावपातळी ५ हजार ६०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दिसून आली..पपईला उठावराज्यातील बाजारात पपईला उन्हाचा चटका कायम असल्याने चांगलाच उठाव आहे. बाजारातील आवक मात्र कमी झालेली आहे. आज मुंबई बाजारातील आवक ५२० क्विंटलवर पोचली होती. तर पपईला कमाल २ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता. तर जास्तीत जास्त माल १ हजार ७५० रुपयाने विकला गेला. पुणे बाजारातील आवक कमी होऊन १४० क्विंटलवर आली होती. तर भाव पातळी २ हजार रुपयांच्या दरम्यान राहीली. कमाल आणि सरासरी भाव एकच होता. छत्रपती संभाजीनगर बाजारातील पपईची आवक आज कमी होऊन २० क्विंटलवरच स्थिरावली होती. तर कमाल, किमान आणि सरासरी भाव शनिवारच्या तुलनेत जास्त होता. पपईला कमाल १४०० रुपये आणि सरासरी १२०० रुपये भाव मिळाला होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.