Maize Grower Issue : केंद्राच्या हस्तक्षेपामुळे मका उत्पादक अडचणीत

Maize Cultivation : गेल्या काही वर्षांत कुक्कुटखाद्य, स्टार्च उद्योगासाठी मक्याची मागणी वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रात मका लागवडी वाढल्या आहेत.
Maize Market
Maize MarketAgrowon

Nashik News : गेल्या काही वर्षांत कुक्कुटखाद्य, स्टार्च उद्योगासाठी मक्याची मागणी वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रात मका लागवडी वाढल्या आहेत. चालू खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यात २ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. मात्र केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मका उत्पादक अडचणीत येणार आहेत. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने मक्याचे आयात शुल्क शून्यावर आणल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

देशात मका पिकाला वाढत्या उद्योगामुळे वाव आहे. मात्र यासाठी पुरवठ्यात तफावत नसताना केंद्राने जवळपास ५ लाख टन मका आयातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मका दरात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने प्रत्यक्षात मागणी व पुरवठ्याचा अंदाज घेऊन उत्पादन वाढीकडे लक्ष देताना धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र असे न करता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असतानाच केंद्राने अधिसूचना काढून दूध उत्पादकांबरोबरच मका उत्पादकांनाही अडचणीत आणले आहे.

Maize Market
Maize, Milk Powder Import : मका, दूधपावडर, सूर्यफूल आणि मोहरी तेलाची कमी शुल्कावर आयात होणार; शेतकऱ्यांना बसणार फटका

गेल्या काही वर्षांत कृषी निविष्ठा खर्चात झालेली वाढ व दरवर्षी होणारी मका बियाण्यातील दरवाढ शेतकऱ्यांसाठी अडचणीची आहे. यासंबंधी केंद्र सरकारने कधीही हस्तक्षेप केलेला नाही. तर आता ग्राहक धार्जिण्या धोरणानंतर आता उद्योगाच्या हिताचे धोरण अवलंबिले आहे.

केंद्राच्या पातळीवर गरजेनुसार उत्पादन वाढ, पुरवठा या संदर्भात धोरणे निश्‍चित होऊन शेतकरी व उद्योगांना दिलासा देणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकार सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे राबवून उद्योग व ग्राहकांना प्राधान्य देत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कांदा उत्पादक भरडला जात आहे. त्यातच आता मक्यासंबंधी घेतलेला निर्णय उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहे.

Maize Market
Maize Variety: जास्त उत्पादन देणारे मक्याचे संकरित वाण कोणते?
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतीमालाच्या दरवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र दर पाडण्यासाठी पुढाकार घेणारे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. सरकारने देशातील गरज भागवून निर्यातवाढीसाठी पाठबळ द्यावे.
अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
केंद्र सरकारने चुकीचा निर्णय घेतला आहे. अगोदरच शेतीसंबंधी घेतलेले निर्णय शेतकरीविरोधी आहेत. एकीकडे यंदा खरीप हंगामात मक्याचा पेरा वाढत असतानाच या निर्णयाची घोषणा झाल्याने शेतकरी पूर्णतः अडचणीत देण्याची शक्यता आहे. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करताना उद्योगांना मोठे करताना दिसत आहे.
पंडित वाघ, मका उत्पादक, बार्डे, ता. कळवण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com