नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक (Valpapadi Ghevada Arrival) २,७०८ क्विंटल झाली. आवक वाढल्याने बाजारभाव (Ghevada Rate) कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,००० ते ५,५०० असा तर सरासरी दर ४,६०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ४,००० ते ७,५०० तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला. (Vegetable Market Rate)
सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक १,४६९ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ४,००० रुपये तर सरासरी दर ३,८०० रुपये मिळाला. गाजराची आवक १२८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,००० ते ४,००० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. उन्हाळ कांद्याची आवक १६,७७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३२५ ते १,३५० तर सरासरी दर १,१०० रुपये राहिला. लसणाची आवक ३४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ८,७०० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,४४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,२५० ते २,१५० तर सरासरी दर १,९०० रुपये राहिला. आल्याची आवक ९२७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ६,००० तर सरासरी दर ५,२०० रुपये राहिला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते २२५ तर सरासरी १७५, वांगी ३०० ते ६०० तर सरासरी ४५०, फ्लॉवर ७० ते १८० सरासरी १५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १३० ते ३०० तर सरासरी २०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला प्रति ९ किलोस ३०० ते ५२५ तर सरासरी दर ४३० रुपये असे दर मिळाले.
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १३० ते ३०० तर सरासरी २००, गिलके ४०० ते ५०० तर सरासरी ४५०, दोडका प्रति १२ किलोस ७०० ते ८५० तर सरासरी दर ७६५ रुपये असे दर मिळाले. फळांमध्ये आंब्याची आवक १० क्विंटल झाली. चौसा वाणाला ३,००० ते ५,००० सरासरी ४,००० असे प्रतिक्विंटलला दर मिळाले. केळीची आवक १,८९७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १,२०० तर सरासरी दर ८०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ८,३७५ क्विंटल झाली. मृदुला वाणास २,५०० ते ९,००० तर सरासरी ६,५०० रुपये दर मिळाला.
पालेभाज्या प्रति १०० जुड्यांचा दर
पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी
गावठी कोथिंबीर...२,०००...७,५००...४,५००
कोथिंबीर हायब्रीड...३,५००...१०,५००...६,२००
मेथी...१,५००...४,५००...३,३००
शेपू...२,०००...४,०००...३,०००
कांदापात...१,५००...५,०००...४,०५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.