Ethanol Policy : इथेनॉलच्‍या किमतीसाठी दीर्घकालीन धोरण करा

Sugar Industry : येणाऱ्या कालावधीत इथेनॉलचे मिश्रण उद्दिष्टाएवढे होण्यासाठी किमतीबाबत केंद्राने दीर्घकालीन धोरण आणि सूत्र तयार करावे, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे.
Ethanol Project
Ethanol ProjectAgrowon

Kolhapur News : येणाऱ्या कालावधीत इथेनॉलचे मिश्रण उद्दिष्टाएवढे होण्यासाठी किमतीबाबत केंद्राने दीर्घकालीन धोरण आणि सूत्र तयार करावे, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. केंद्राने कारखान्यांना सुमारे ४०० कोटी लिटरने क्षमता वाढवण्यास प्रोत्साहित करावे, यासाठी अंदाजे १७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. ही गुंतवणूक वाढविण्यासाठी इथेनॉलच्‍या किमती वाढवण्याची मागणीही उद्योगातून होत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ही मागणी लावून धरली आहे.

सध्या साखर उद्योगाची इथेनॉल उत्पादनासाठी ७०० कोटी लिटरची स्थापित क्षमता आहे. आम्ही ८० टक्के क्षमतेच्या वापरावर काम करतो. आम्हाला आमची स्थापित क्षमता १,००० ते १,१०० कोटी लिटरपर्यंत वाढवायची असल्याचेही ‘इस्मा’च्या सूत्रांनी सांगितले.

इथेनॉलचे मिश्रण चालू इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (डिसेंबर २२-नोव्हेंबर २३) १२ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Ethanol Project
Innova Ethanol Car : १०० टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लॉंचिंग

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून इथेनॉल उत्पादकाला प्रोत्साहित करणारे निर्णय घ्‍यावे लागतील यासाठी पहिल्यांदा इथेनॉलच्या किमती वाढविण्यासाठी प्रयत्न हवेत. उसाचा रस, सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत ६५ रुपये प्रति लिटरवरून ६९.८५ रुपये करावी, अशी मागणी ‘इस्‍मा’ची आहे. केंद्राने एकीकडे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एफआरपी’त वाढ केली. पण साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ केली नाही.

Ethanol Project
Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवर भर देणे फायदेशीर

गेल्या काही वर्षांपासून ३१०० रुपये इतकीच किमान विक्रीची किंमत ठेवली आहे. ती ३८०० रुपये केल्‍यास कारखान्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्‍यास मदत होईल. किमान विक्री मूल्य कमी असतानाही साखर कारखाने ‘एफआरपी’ देण्यासाठी धडपडत आहेत.

स्‍थानिक बाजारात साखरेच्‍या किंमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याने देशांतर्गत बाजारात कारखान्यांना साखरेच्या वाढत्या किमतीचा लाभ घेता येत नसल्याची स्‍थिती आहे.

एकूणच अशा बाबींमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. या पार्श्‍वभूमीवर इथेनॉलसाठी तरी केंद्राने कारखान्‍यांना फायदेशीर धोरण तयार करावे अशी आमची मागणी असल्याचे ‘इस्‍मा’ने सांगितले.

३१७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

सरकारने साखर उद्योगाव्यतिरिक्त इतर धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीबाबत जलदगतीने निर्णय घेताना किमतीत वाढ केली. पण त्या तुलनेत ऊस, साखरेपासून तयार होणाऱ्‍या इथेनॉलचे दर त्या प्रमाणात वाढविले नाहीत.

केंद्र सरकारने साखर उद्योगाला यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल योजना प्राधान्याने कराव्या लागतील. येणाऱ्या वर्षात इथेनॉलसाठी ४५ लाख टन साखर वळवल्यानंतर ३१७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशांतर्गत मागणी २८० लाख टन आहे. सुरुवातीचा साठा सुमारे ५५ लाख टन असेल असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com