Innova Ethanol Car : १०० टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे लॉंचिंग

Toyota Innova Car : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा इनोव्हा कारच्या १०० % इथेनॉल-ईंधन इंजिन असलेल्या मॉडेलचे लॉंचिंग केले.
Innova Ethanol Car
Innova Ethanol Caragrowon

Ethanol Car : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज (ता. २९) टोयोटाच्या इनोव्हा कार (Toyota Innova car)च्या १०० % इथेनॉल-ईंधन इंजिन असलेल्या मॉडेलचे लॉंचिंग केले.

याबाबत मंत्री गडकरी यांनी मींट शाश्वत विकास परिषदेत बोलताना ही माहिती दिली. त्यांच्यासोबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते.

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, आम्ही वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनावर चालणारी आणि हरीत वाहने आणण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. गेल्यावर्षी टोयोटा मिराई ईव्ही ही हायड्रोजनवर चालणारी कार लाँच केली होती. आज १०० टक्के इथेनॉलवर चालणारी (Toyota) इनोव्हा कार लॉन्च केली आहे. याबाबत पीटीआयच्या वृत्तानुसार, ही जगातील पहिली BS-VI (Stage-II), इलेक्ट्रिक फ्लेक्स-इंधनाची कार असणार आहे.

याबरोबर मी २००४ मध्ये देशात पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर जैवइंधनाच्या कामगिरीवर भर दिला. यासाठी ब्राझीलसारख्या देशांना भेटी दिल्या. यातून मला समजले जैवइंधन आश्चर्यकारक काम करू शकते. पेट्रोलियम पदार्थांवरील आयातीचा खर्च कमी होऊ शकतो. बर्‍याच प्रमाणात परकीय चलनाची बचत होण्याची मला खात्री वाटली.

Innova Ethanol Car
Raju Shetti Vs Hasan Mushrif : मुश्रीफांच्या रक्तपाताच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी घेतला समाचार

गडकरी म्हणाले की आपल्याला तेल आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या यासाठी १६ लाख कोटी रुपये खर्च होतात. हे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे. भारताला अधिक शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण देशात प्रदूषण ही एक मोठी समस्या बनत चालली आहे.

हवा आणि जलप्रदूषण कमी करण्याची गरज आहे. आपल्या नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. या वर्षाच्या अखेरीस द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामासह ६५,००० कोटी रुपयांचे विविध रस्ते प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे, असेही मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com