Maize Market : खानदेशात मका दर १५७५ चे २२०० रुपये

Maize Rate : खानदेशात मक्याची मळणी निम्मी पूर्ण झाली आहे. प्रतिएकर २० ते २२ क्विंटल उत्पादन हाती येत आहे. मळणी आणखी ८ ते १० दिवस सुरू राहील, असे दिसत आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon

Jalgaon News : खानदेशात मक्याची मळणी निम्मी पूर्ण झाली आहे. प्रतिएकर २० ते २२ क्विंटल उत्पादन हाती येत आहे. मळणी आणखी ८ ते १० दिवस सुरू राहील, असे दिसत आहे. बाजारात मक्यास किमान १५७५, १६००, १६१०, १६५० रुपये ते कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर (Maize Rate) मिळत आहे. मक्याचे दर स्थिर आहेत.

खानदेशात मळणीला गती आली असून, नोव्हेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तसेच डिसेंबर व जानेवारीत लागवड केलेल्या मका पिकात कापणी, कणसे खुडण्याचे काम सुरू आहे. कमाल शेतकऱ्यांनी मक्याची लागवड नोव्हेंबरच्या सुरुवातीला केली होती. यंदा खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. लागवड किंचित वाढली होती.

Maize Market
Maize Rate : खानदेशात मकादर १८५० ते २२०० रुपये

परंतु खानदेशात लागवड सरीसरीएवढी म्हणजेच ४५ हजार हेक्टरवर झाली नव्हती. मका पिकात यंदाही दोन वेळेस अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. अळीमुळे उत्पादनावर १५ ते २० टक्के परिणाम झाला. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि पुढे पीक दोन महिन्यांचे झाल्यावर अळीची समस्या अधिक होती. त्यावर शेतकऱ्यांनी मात केली.

गुणवत्तापूर्ण वाणांचा वापर, ठिबक व केळी, सोयाबीन आदी पिकांच्या बेवडमुळे काही शेतकऱ्यांना उत्पादन बरे येत आहे. काही शेतकरी एकरी ३० ते ३२ क्विंटल उत्पादनदेखील साध्य करीत आहेत. परंतु सरासरी उत्पादन २० ते २२ क्विंटलपर्यंत आहे.

Maize Market
Maize Seed : घरचे बियाणे वापरावर आदिवासी शेतकऱ्यांचा भर

मक्यासाठी प्रतिएकर (मशागत, बियाणे, खते, संप्रेरके, कापणी, मळणी व इतर खर्चासह) १७ ते १९ हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च वजा करून जुजबी नफा मिळत आहे. किमान १५७५ ते कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल हा दर लक्षात घेता प्रतिएकर २२ ते २५ हजार रुपये नफा शेतकऱ्यांना मिळत आहे.

मक्याच्या चाऱ्यास मागणी

मक्याच्या चाऱ्यास मागणी आहे. प्रतिएकर पाच ते साडेपाच हजार रुपये दर मका चाऱ्यास आहे. एका एकरात २०० ते २५० पेंढ्या मिळतात. अधिक उंचीच्या चाऱ्यास अधिकचा दर आहे. अनेक शेतकरी चारा विक्रीतून मका कापणी, मळणी आदी खर्च काढून घेत आहेत.

चारा खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरात, राज्यातील बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर भागातील खरेदीदारदेखील येत आहेत. अनेक दूध उत्पादक चाऱ्याची साठवणूक करून घेत आहेत. त्यामुळे मक्याच्या चाऱ्यास यंदा चांगला उठाव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com