Maize Rate : खानदेशात मकादर १८५० ते २२०० रुपये

Maize Market Price : खानदेशात मका आवकेत मागील चार-पाच दिवसांत वाढ झाली आहे. खानदेशातील प्रमुख पाच बाजार समित्यांमध्ये सध्या प्रतिदिन सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Maize Market Update : खानदेशात मका आवकेत (Maize Arrival) मागील चार-पाच दिवसांत वाढ झाली आहे. खानदेशातील प्रमुख पाच बाजार समित्यांमध्ये सध्या प्रतिदिन सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. दर (Maize Rate) १८५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा बाजार समितीत मक्याची चांगली आवक होत आहे. या बाजार समित्यांमध्ये आठवडाभरापूर्वी प्रतिदिन सरासरी मिळून चार हजार क्विंटल मक्याची आवक होती. आता ही आवक सहा हजार क्विंटलपर्यंत पोहोचली आहे.

Maize
Maize Market : पाकिस्तानचा मका भारतापेक्षा स्वस्त; पण भारताला निर्यातवाढीची संधी

त्यात मागील चार ते पाच दिवसांत वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होत आली आहे. तसेच नोव्हेंबरअखेरीस लागवड केलेल्या मक्याची कापणी, मळणी सुरू आहे. डिसेंबरच्या मध्यात व अखेरीस लागवड केलेल्या मक्याची मळणी पुढील १५ दिवसांनंतर सुरू होईल.

Maize
Maize Cultivation : चंद्रपुरमधील मूल तालुक्‍यात २०० हेक्‍टरवर मका लागवड

खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती, ती मागील हंगामाच्या तुलनेत काहीशी वाढली होती. परंतु पाच वर्षांपूर्वी मक्याची रब्बीत ४२ ते ४७ हजार हेक्टरवर लागवड व्हायची. अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप, वाढता खर्च आणि कोविड काळानंतर लागवड कमी झाली.

मागील हंगामात रब्बीमध्ये फक्त ३० हजार हेक्टरवर मका पीक होते. त्यात यंदा वाढ झाली. यंदा मक्याला उठावदेखील आहे. खरिपातील मक्यास किमान १७०० रुपये तर कमाल २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

सध्यादेखील दर स्थिर आहेत. खासगी बाजारांतही खरेदी केली जात आहे. खेडा खरेदीदेखील सुरू आहे. त्यात किमान १८०० ते कमाल २१५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. अनेक शेतकरी खेडा खरेदीत मका विक्रीस पसंती देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com