Maize Production : चांगल्या पावसामुळे गहू, मका उत्पादनात वाढ

Rabi Crop : येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांतील दुष्काळी भागाला तर दर दोन-तीन वर्षाच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ येते.
Maize Production
Maize ProductionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील रब्बी हंगाम पूर्णतः खरिपातील पावसावर अवलंबून असतो. यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने कृपा केल्याने जिल्ह्याच्या सर्वच भागांत रब्बीची पिके घेतली गेली. तब्बल एक लाख १५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती.

गेल्या वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टरने वाढले आहे. शिवाय, वातावरणाने चांगली साथ दिल्याने रब्बीच्या उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसते. सध्या रब्बी हंगामातील पिके काढण्याची लगबग सुरू असताना दिसते.

पावसाच्या प्रमाणावर जिल्ह्याचा रब्बी हंगामाचा पीक पॅटर्न अवलंबून असतो. किंबहुना अर्धा जिल्हयात रब्बीची पिके पावसावरच ठरली जातात. अनेकदा तर येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यात खरिपात पावसाने वाट पाहायला लावल्यास गव्हाचे पीक निघत नाही.

परिणामी बागायतदारांना गहू विकत घेण्याची वेळ येते. एक दोन वर्षात ही परिस्थिती उद्भवतेच. मागील वर्षीही दुष्काळामुळे रब्बीचा अर्ध्या जिल्ह्यात पाचोळाही निघाला नव्हता. यावर्षी मात्र सरते शेवटी मुसळधार पाऊस झाल्याने रब्बीची पिके निघाली आहेत.

येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांतील दुष्काळी भागाला तर दर दोन-तीन वर्षाच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ येते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील रचना विषमतेची असून अनेक भागात कालव्याचे पाणी पोहोचलेले नाही. जोडीनेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे.

Maize Production
Maize Crop Failure: सदोष मका बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी

यंदा १०२ टक्क्यांवर पेरणी

जिल्हा तसा खरिपाचा असून खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३५ हजार असताना रब्बीचे क्षेत्र सरासरी एक लाख १३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. एक हजार ६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावेच रब्बी हंगामाची असून दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढून एक लाख १५ हजार ५७० हेक्टरवर म्हणजेच १०२ टक्के पेरणी झाली होती, हेच क्षेत्र मागील वर्षी दुष्काळामुळे केवळ ८६ हजार ८०० हेक्टर इतकेच होते.

सध्या जिल्हाभर गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आहे, यासाठी ठिकठिकाणी हरियाना व पंजाब परिसरातून हार्वेस्टर देखील दाखल झाले आहेत. मजूर मिळत नसल्याने शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून गव्हाची सोंगणी करताना दिसत आहे. हरभऱ्याची ही मजुराच्या माध्यमातून काढणी सुरू आहे.

Maize Production
Maize Market : खानदेशात मका आवकेत वाढ

पाणी उपलब्धतेमुळे चित्र बदलले

रब्बी हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र गावाखाली गुंतवले जाते. या खालोखाल रब्बी मक्याकडेही कल वाढत असून हक्काचे उत्पन्न देणारे हे पीक असल्याने शेतकरी रब्बी मक्याला पसंती देत असल्याने सरासरीच्या दुप्पट मका लागवड यंदा झाली. कमी पाण्याचे पीक आणि भाव देणारे कडधान्य म्हणून हरभऱ्याचे तीस हजारवर हेक्टर क्षेत्र अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यात गुंतवले गेले तर करडई, जवस, तीळ ही पिके हद्दपार झाल्याचे चित्र रब्बीतही दिसले.

सूर्यफुलाची नाममात्र ५० हेक्‍टरवर पेरणी जिल्ह्यात झालेली होती. एकूणच पीक पॅटर्न तोच असला तरी उपलब्ध पाण्यामुळे कांद्यापाठोपाठ तृणधान्य आणि कडधान्याला शेतकऱ्यांनी मोठी पसंती दिल्याचे दिसते.

जिल्ह्यातील रब्बीची पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र पेरणी टक्के

ज्वारी ४,०६५ ४,४६० ११०

गहू ६४,१५१ ६१,०२८ ९५

मका ८,४१९ १६,२५२ १९३

हरभरा ३५,०८६ ३०,४४३ ८७

एकूण १,१३,५७६ १,१५,५७० १०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com