Agrowon Podcast : मक्याची आवक, दर टिकून; कापूस, सोयाबीन, हळद तसेच काय आहेत केळी दर

Daily Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, हळद, केळी आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ९.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१८ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.

देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : हळदीचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, हिरवी मिरची तसेच काय कांदा दर आहेत?

कापूस दबावातच

कापूस बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून जागचे हालताना दिसत नाहीत. देशातील उत्पादन घटले तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत.

मंगळवारी देशातील बाजारात २ लाख ६ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर कापसाचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचा बाजार टिकून

देशातील बाजारता हळदीचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिरावला आहे. हळदीचे भाव गेल्या वर्षभरातील उच्चांकी २० हजारांपासून १३ हजारांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील हळदीची लागवड वाढली. मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचाही फटका बसत आहे. त्यामुळे हळद उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

आज देशातील बाजारात हळदीला १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नव्या मालाची आवक पुढील ३ आठवड्यांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Chana Sowing : देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच; लागवडीची आघाडी गेल्यावर्षीपेक्षा एक टक्क्यापेक्षाही कमी

मक्याचे दर टिकून

मक्याचा बाजार मागील आठवड्यांपासून स्थिरावला आहे. बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरावल्याचे खरेदीदार सांगत आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिरावली आहे.

तर मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे. त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे.

नवती बागांमधून काही प्रमाणात केळीची आवक सुरु झाली. पण आवकेचा जोर वाढलेला दिसत नाही. त्यातच थंडीचा केळी बागांवर परिणाम दिसत आहे. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीचा बाजार टिकून राहू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com