Sugar Market : जुलैच्या साखर विक्रीस १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Sugar Sale : गेल्या वर्षीपेक्षा या ऑगस्टमध्ये साडेतीन लाख टनांनी साखर कोटा कमी दिला आहे. गेल्या वर्षी दोन टप्प्यात साखर कोटा दिला होता.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्राने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा देशातील साखर कारखान्यांना दिला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या ऑगस्टमध्ये साडेतीन लाख टनांनी साखर कोटा कमी दिला आहे. गेल्या वर्षी दोन टप्प्यात साखर कोटा दिला होता. पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख टन तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख टन अतिरिक्त कोटा केंद्राने दिला होता.

ज्या कारखान्यांचा जुलैचा कोटा संपलेला नाही, त्या कारखान्यांना जुलैची साखर १५ ऑगस्टपर्यंत विकता येणार आहे. केंद्राने जुलैला २४ लाख टनांचा कोटा कारखान्यांना दिला होता. ऑगस्टपासून सणावाराचे दिवस सुरू होणार असल्याने कारखान्यांना साखर विक्री सुलभ व्हावी म्हणून जुलैचा कोटा ऑगस्टपर्यंत विकण्यास परवानगी दिल्याची माहिती सार्वजनिक अन्न व वितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

Sugar Market
Sugar Packing : साखरेसाठी महागड्या ज्यूट गोण्यांची सक्ती नको

याचबरोबर साखर पट्ट्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका कारखान्यांना बसू नये, यासाठीही ही मुदतवाढ दिल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. देशातील अनेक साखरपट्ट्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे. पाऊस वाढल्याने साहजीकच शीतपेये व आइस्क्रीम उद्योगातून साखरेला मागणी घटली आहे.

सध्या केवळ घरगुती ग्राहकावरच कारखान्यांच्या साखर विक्रीचे सूत्र अवलंबून आहे. जून अखेरपर्यंत साखरेला चांगली मागणी होती. १५ जुलैनंतर पावसाला सुरवात होताच हळूहळू मागणी कमी झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

Sugar Market
Sugar Factory : विरोधकांच्या कारखान्यांवर फुली

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी चांगली येईल, या अपेक्षेत साखर कारखानदार आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये सध्या पूरस्थिती असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी साखरेच्या विक्रीला फारसे प्राधान्य दिलेले नाही. यामुळे देशांतर्गत बाजारात जूनच्या तुलनेत जुलैमध्ये साखरेची विक्री कमी असल्याचे चित्र आहे.

श्रावणात काहीशा दरवाढीची अपेक्षा

श्रावणातील सण सुरू होताच मागणी काहीशी वाढेल व दरात ही थोडेफार तेजी येईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. पूरस्थिती सामान्य झाल्यास व पाऊस थांबल्यास साखरेच्या मागणीत वाढ होऊन साखरेच्या क्विंटलला ५० रुपयापर्यंत जादा दर मिळू शकतील, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सध्या साखरेचा दर सरासरी ३५५० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com