Jowar For Birds : शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी एकरभर ज्वारी ठेवली राखीव

Latest Agriculture News : चिऊताई, चिऊताई लवकर या..चारा खा.. पाणी प्या.. भुर्रकन उडून जा. आणि भूक लागल्यावर परत खायला या... अशी चिमण्यांसह शेकडो भुकेल्या पक्ष्यांना हाक दिली आहे.
Jowar For Birds
Jowar For Birds Agrowon

Pune News : चिऊताई, चिऊताई लवकर या..चारा खा.. पाणी प्या.. भुर्रकन उडून जा. आणि भूक लागल्यावर परत खायला या... अशी चिमण्यांसह शेकडो भुकेल्या पक्ष्यांना हाक दिली आहे. मळद (ता. बारामती) येथील शेतकरी श्रीकांत सुरेश लोंढे यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पक्षांना खाद्य मिळावे यासाठी आपले १ एकर ज्वारीचे क्षेत्र राखीव ठेवून चारा आणि पाण्याची सोय केल्याने लोंढे कुटुंबियांचे परिसरात कौतुक होत आहे.

मागील काही वर्षांपासून शहरांसह ग्रामीण भागात चिमण्या व इतर अनेक पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.याचे कारण म्हणजे सिमेंटची जंगले उभा करण्यासाठी व रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड. त्यामुळे पक्षांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.

Jowar For Birds
Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

शिवाय रस्त्याच्या व इतर वृक्षतोड झालेल्या ठिकाणी वृक्षलागवडीचे असणारे कमी प्रमाण. तसेच पक्ष्यांचे मुख्य खाद्य पिकांवरील किडे, धान्य असून सध्या पिकांची मोठ्या प्रमाणात व लवकर वाढ व्हावी यासाठी रासायनिक खतांचा व कीडकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने पक्ष्यांना खाण्यासाठी अन्नद्रव्य मिळत नसल्यानेही पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे.

Jowar For Birds
Jowar GI Rating : ‘दगडी ज्वारी’ला भौगोलिक मानांकन

दाणे टिपणाऱ्या पक्ष्यांना पाहून समाधान

देवाने आपल्यासाठी भरपूर दिले आहे. आपणही कोणाचे तरी देणे लागतो, याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. आम्ही १ एकर ज्वारी पेरली होती जी चांगली जोमदार आली आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. पशू-पक्ष्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

पक्ष्यांची संख्या वाढावी त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी या हेतूने आम्ही कुटुंबियांनी विचार केला व सर्व १ एकरातील ज्वारी पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. पशू-पक्षी शेतात ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी आल्यानंतर वेगळे समाधान मिळत आहे, असे शेतकरी श्रीकांत लोंढे यांनी सांगितले.

आपल्या शेताच्या बांधावर असणारी काटेरी झाडे बोरी, बाभळी, करंज, रामफळ, सीताफळ, कडूनिंब, उंबर ही झाडे ठेवली पाहिजेत. ही झाडे पक्षी निवाऱ्यासाठी खूप महत्त्वाची असतात. त्याच्या बदल्यात पक्षी कीड नियंत्रणाचे काम करीत असतात. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. स्थानिक देशी झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे.
- डॉ. महेश गायकवाड, पक्षी, पर्यावरण तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com