Cotton Productivity: ‘देशातील कापसाची उत्पादकता वाढविणे शक्य’

South Asia Biotech: कापूस पिकात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादकता वाढून समस्या सोडवता येतील, असे निरीक्षण साउथ एशिया बायोटेक्नाॅलाॅजिकल सेंटरच्या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Pune News: कापूस पिकात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादकता वाढून समस्या सोडवता येतील, असे निरीक्षण साउथ एशिया बायोटेक्नाॅलाॅजिकल सेंटरच्या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. ठिबक सिंचन, ठिबक फर्टिगेशन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या तंत्रांच्या माध्यमातून कापसाची उत्पादकता वाढविणे शक्य आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.

साउथ एशिया बायोटेक्नाॅलाॅजी सेंटरने खरीप हंगाम २०२४ मध्ये, हरियाना राज्यात सिरसा जिल्ह्यातील गिंद्रन गावामध्ये उच्च-तंत्रज्ञान पुनरुत्पादक कापूस प्रात्यक्षिक घेतले होते. या प्रात्यक्षिकातून स्पष्ट झाले, की तंत्रज्ञानाच्या वापराने कापूस उत्पादकता, संसाधन कार्यक्षमता आणि शाश्‍वतता वाढवणे शक्य आहे.

Cotton
CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ खरेदीतून होतोय शेतकऱ्यांवर अन्याय

“ठिबकसारख्या सूक्ष्म सिंचनाच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पाण्याची ६० टक्क्यांपर्यंत बचत तर झाली, शिवाय पिकाची उगवण क्षमता जास्त होती. झाडांची वाढही चांगली झाली, पिकाची ठेवण चांगली होती आणि उत्पादकतेत वाढ झाली,” असे साउथ एशिया बायोटेक्नाॅलाॅजी सेंटरचे संस्थापक संचालक भगाीरथ चौधरी म्हणाले.

“ठिबक फर्टिगेशनमुळे खतामधील पोषण तत्त्वांचा कार्यक्षम वापर होतो. ठिबक फर्टिगेशनमधून ५४ टक्के नत्रयुक्त खते, ३३ टक्के स्फुरदयुक्त खते आणि ७९ टक्के गंधकयुक्त खते दिल्यास खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि खतांची नासाडी टाळता येते”, असे चौधरी यांनी सांगितले.

Cotton
Smart Cotton Project: ‘स्मार्ट कॉटन’ची सत्यकथा

उत्पादकता वाढली

ठिबक फर्टिगेशनला अत्याधुनिक शेतीची जोड दिल्यानंतर उत्पादकता वाढीलाही मदत झाली. गतवर्षी हरियानात सरासरी एकरी ८ ते ९ क्विंटल कापूस उत्पादकता होती. प्रात्यक्षिकातून एकरी उत्पादकता १३ क्विंटलपर्यंत मिळाली, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.

आशेचा किरण

कापूस उत्पादनात पाण्याचा आणि खतांचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी एक आदर्श उत्पादन पद्धती म्हणून ठिबक फर्टिगेशनचा वापर करावा. तसेच फेरोमोन सापळे, एकात्मिक कीड व्यवस्थापन केले तर कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो. ठिबक फर्टिगेशनसोबतच कापूस पिकाला शाश्‍वत सिंचनाची उपलब्धता आणि हवामान बदलाची समस्या कमी करण्यासाठी पाणी साठवण टाके आणि सोलार सिंचन पद्धती आवश्यक आहेत. हे तंत्र शेतकरी, जिनर्स, स्पिनर्स आणि कापड उद्योगासाठी एक आशेचा किरण ठरू शकते, असा विश्‍वासही भगीरथ चौधरी यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com