Cotton Production : देशात कापूस उत्पादकता सुधारण्याचे संकेत

देशाची कापूस उत्पादकता मागील तीन वर्षे सतत घटली आहे. यंदा उत्पादकता किंचित वाढू शकते, असे संकेत आहेत. ती पावणेपाचशे किलो रुई प्रतिहेक्टरीपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः देशाची कापूस उत्पादकता (India's Cotton Productivity) मागील तीन वर्षे सतत घटली आहे. यंदा उत्पादकता किंचित वाढू शकते, असे संकेत आहेत. ती पावणेपाचशे किलो रुई (Cotton) प्रतिहेक्टरीपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जगात भारत सर्वाधिक कापूस लागवड (Cotton Production) करतो. यंदाची लागवड १२९ लाख हेक्टरवर आहे. पण उत्पादकतेत भारत पाकिस्तानसारख्या देशांच्या देखील मागे आहे. यातच मागील तीन वर्षे उत्पादकता सतत घटली आहे. अतिपाऊस, गुजरात, महाराष्ट्र व उत्तर भारतात कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा (Pink Boll worm) प्रादुर्भाव आदी कारणे उत्पादकता घटण्यामागे आहेत.

Cotton Production
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

मागील तीन वर्षे सरासरी ५०० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी उत्पादकतादेखील गाठता आलेली नाही. महाराष्ट्राची कापूस उत्पादकता सिंचन सुविधांचा अभाव, गुलाबी बोंड अळीचे संकट आणि अतिपाऊस यामुळे गुजरात, मध्य प्रदेश व उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत कमी राहिली आहे.

देशाच्या कापूस उत्पादनात महाराष्ट्रातील स्थितीचा मोठा परिणाम दिसतो. कारण देशात सर्वाधिक ४३ ते ४४ लाख हेक्टरवर कापूस लागवड महाराष्ट्रात केली जाते. महाराष्ट्रातील कापूस लागवड चीन, अमेरिका आदी देशांमधील कापूस लागवडीपेक्षा अधिक असते. परंतु राज्यातील कापसाखील फक्त चार ते पाच टक्के क्षेत्र ओलिताखाली असते. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये कापसाखालील ५५ टक्क्यांवर क्षेत्र ओलिताखाली आहे.

Cotton Production
Cotton Market : कापूस बाजार अद्यापही दबावात का?

उत्तर भारतात ९० टक्क्यांवर कापसाखालील क्षेत्रात सिंचनाची सुविधा आहे. महाराष्ट्रात मागील तीन वर्षे अतिपाऊस आहे. त्यापूर्वी दुष्काळी स्थिती होती. यामुळे महाराष्ट्राची मागील तीन हंगामांतील कापूस उत्पादकता सरासरी ४०० किलो रुई एवढीदेखील राहिलेली नाही. मागील वर्षी कापूस उत्पादकता ३१५ किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी होती. ती यंदा ३५० किलो रुई प्रतिहेक्टरीपर्यंत राहू शकते. अर्थातच महाराष्ट्रात एकरी सात ते साडेसात क्विंटल एवढेच कापूस उत्पादन सरासरी शेतकऱ्यांच्या हाती येईल, असे दिसत आहे.

नवतंत्रज्ञानाची आवश्यकता

कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी देशात कापूस बियाण्यातील सुधारित तंत्रज्ञान किंवा ‘बोलगार्ड ३’, ‘बोलगार्ड ४’ या तंत्रज्ञानाची मागणी कापूस उद्योग व इतरांकडून सतत केली जात आहे. यासंबंधी केंद्र सरकारकडेही कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संघटनांनी मागणी केली आहे. केंद्राने काही महिन्यांपूर्वी या तंत्रज्ञानाच्या चाचण्या हरियानात करण्यासंबंधी मंजुरी दिली आहे. या संबंधी गतीने काम होण्याची अपेक्षा आहे. ‘‘बोलगार्ड ४’ तंत्रज्ञान आल्यास कापूस उत्पादकता वाढेल’’, असे मत शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांनी व्यक्त केले.

कापूस उत्पादकता यंदा किंचित वाढू शकते. पण त्यात मोठी वाढ होणार नाही. कारण राज्यातील कापसाखाली कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. चांगला पाऊस झाल्याने राज्यात व इतर भागांत कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती सुधारली आहे.
गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक

विविध देशांची २०२१-२२ मधील कापूस उत्पादकता (उत्पादकता किलो रुई, प्रतिहेक्टरी)

ऑस्ट्रेलिया-१२००

अमेरिका-९००

चीन - १०००

ब्राझील - ९००

पाकिस्तान -७००

भारत - ४६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com