Agriculture Commodity Market मार्च महिन्यात मूग व तूर (Tur Rate) यांच्या किमतीत वाढ झाली आहे. हरभरा (Chana Rate) वाढत्या पातळीवर स्थिर आहे. कापूस व सोयाबीन (Cotton Soybean Rate) यांच्या किमतीत घट दिसून येत आहे.
रब्बी कांद्याची आवक (Rabi Onion Arrival) वाढणार असली तरी हा कांदा साठवणीसाठी योग्य असल्याने किमती यापुढे फार घसरण्याचा संभव कमी आहे. कापूस व सोयाबीन यांच्या किमतीही वाढणार नसल्याचा अंदाज आहे.
१० मार्च रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६२,५८० वर आले होते. याही सप्ताहात ते ०.७ टक्क्याने घसरून रु. ६२,१२० वर आले आहेत.
एप्रिल फ्यूचर्स भाव २.५ टक्क्यांनी घसरून रु. ६१,९०० वर आले आहेत. जून फ्यूचर्स रु. ६३,१४० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.६ टक्क्याने अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु १,५५४ वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १.७ टक्क्यांनी घसरून रु. १,५२८ वर आले आहेत.
एप्रिल फ्यूचर्स रु. १,५९५ आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. कापसाची आवक वाढत्या पातळीवर आहे.
मका
NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या याच पातळीवर स्थिर आहेत.
फ्यूचर्स (एप्रिल डिलिव्हरी) किमती रु. २,११७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,१४२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु.१,९६२ आहे. मक्याची आवक घसरती आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,९२४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने वाढून रु. ६,९८५ वर आल्या आहेत.
एप्रिल फ्यूचर्स किमती ०.८ टक्क्याने घसरून रु. ६,९१४ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ७,०८६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १.४ टक्क्याने अधिक आहेत. आवक वाढत आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.१ टक्का वाढून रु. ४,७५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून ४,७२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे.
मूग
मुगाच्या किमती फेब्रुवारी महिन्यात स्थिर होत्या. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ८,००० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ८,०२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक घटली आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) १.४ टक्क्याने घसरून रु. ५,४५४ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.९ टक्क्याने घसरून ५,४०४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ७,३०८ वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची बाजार समितीतील सर्वाधिक साप्ताहिक आवक फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात होती; त्यानंतर जरी ती कमी झाली असली तरी अजूनही लक्षणीय आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल, कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो), कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.