Vegetable Rate : कळमना बाजारात पालेभाज्यांच्या दरात तेजी

कळमना बाजार समितीत आवक होणाऱ्या पालेभाज्यांच्या किमतीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये पालक आणि मेथी आघाडीवर असून मेथीची आवक वाढती असताना दरातही तेजी अनुभवली जात आहे.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

नागपूर : कळमना बाजार समितीत आवक होणाऱ्या पालेभाज्यांच्या किमतीत (Leafy Vegetable Rate) मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये पालक (Spinich) आणि मेथी आघाडीवर असून मेथीची आवक (Fenugreek Arrival) वाढती असताना दरातही तेजी अनुभवली जात आहे. मेथीची आवक गेल्या आठवड्यात १०० क्विंटल असताना या आठवड्यात १३० क्विंटलवर पोहचली तर दरही ५००० ते ५५०० पोचल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले.

Vegetable Market
Vegetable Market : टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात सुधारणा

पावसामुळे पालेभाज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात आवक कमी आणि त्या तुलनेत मागणी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दर कडाडले आहेत. पालक आवक १४० क्विंटल तर दर २००० ते २५०० रुपये याप्रमाणे गेले आठवड्यात होते. या आठवड्यात आवक १७० क्विंटलवर तर दरही प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढले. २५०० ते ३००० रुपयांनी पालकाचे व्यवहार झाले. बाजारात मेथीचे दर गेले आठवड्यात ३००० ते ५००० रुपये क्विंटलवर होते. या आठवड्यात त्यात मोठी तेजी अनुभवली गेली.

Vegetable Market
Wild Vegetable : रानभाज्यांच्या संवर्धनाला मिळतेय बळ

५००० ते ५५०० रुपयांनी मेथीचे व्यवहार झाले. फुलकोबीची आवक ३५० क्विंटल तर दर ४००० ते ५००० रुपये होते. पत्ताकोबीचे व्यवहार १५०० ते २००० रुपयांनी झाले आणि आवक ७२० क्विंटल होती. पत्ताकोबीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति क्विंटल तीनशे रुपयांची घट झाल्याचे सांगण्यात आले. चवळी भाजी २००० ते २५०० रुपये क्विंटल आणि आवक १५ क्विंटलची होती. बीट ३००० ते ३५०० रुपयांवर होते. गेल्या आठवड्यात बीटचे व्यवहार २००० ते २५०० रुपयांनी झाले. ढेमूस आवक अवघी १० क्विंटल तर दर ४००० ते ४२०० रुपये होते. कारलीच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आली आहे. २८०० ते ३००० रुपयांनी कारलीचे व्यवहार झाले असताना या आठवड्यात ते ३००० ते ३५०० रुपये असा दर होता. हिरव्या मिरचीची आवक ६१० क्विंटल इतकी आहे. ३००० ते ३५०० असा मिरचीचा दर होता. ढोबळी मिरची ४००० ते ४५०० रुपये क्विंटल तर आवक ३८० क्विंटलची झाली

हरभरा हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

बाजारात हरभऱ्याचे व्यवहार हमीभावापेक्षा कमी दराने होत आहेत. गेल्या आठवड्यात ४१०० ते ४५७६ रुपयांनी हरभरा व्यवहार झाले. बाजारातील हरभऱ्याची आवक ३२६ क्विंटल आहे. तुरीची आवक ९९ क्विंटल तर दर ६५०० ते ७५०० होते. तांदूळ देखील बाजारात नियमित दाखल होत असून दहा क्विंटल इतकी आवक आहे. ४५०० ते ४८०० रुपयांनी तांदळाचे व्यवहार झाले. गव्हाचे व्यवहार २३०० ते २४०० रुपयांनी झाले, आवक ३२५ क्विंटल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com