Sugarcane
Sugarcane Agrowon

Sugarcane : अमरावतीत रसवंतीसाठीच्या उसाच्या आवकेत वाढ

Sugarcane Production : उन्हाळ्यामुळे सध्या उसापासून तयार रसाला मागणी राहते. परिणामी अमरावती बाजार समितीत सध्या छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून रसवंतीसाठीच्या उसाची आवक वाढली आहे.

Amaravati News : उन्हाळ्यामुळे सध्या उसापासून तयार रसाला मागणी राहते. परिणामी अमरावती बाजार समितीत सध्या छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून रसवंतीसाठीच्या उसाची आवक वाढली आहे. दररोज सरासरी ४० टन उसाची आवक होत असल्याची माहिती व्यापारी नौशाद अली यांनी दिली.

रसवंतीसाठी रसाचे प्रमाण अधिक असलेल्या हिरव्या उसाला मागणी राहते. अमरावती बाजार समिती अंतर्गत असलेल्या फळे व भाजीपाला बाजारात सद्यःस्थितीत अशा उसाची आवक होत आहे. या उसाचा सरासरी आठ महिन्याचा हंगाम राहतो.

Sugarcane
Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

उन्हाळ्याच्या दिवसात पौष्टिक पेय म्हणून उसाच्या रसाला सर्वदूर मागणी राहते. परिणामी, या काळात या उसाची आवक ५५ ते ६० टनापर्यंत होते. आता पावसाळा तोंडावर आला आहे.

Sugarcane
Sugarcane Disease : ऊस पिकातील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण

पावसाळ्यात उसाच्या रसालाही मागणी राहत नाही. परिणामी, राज्यातून होणारी उसाची आवक देखील टप्प्याटप्प्याने कमी होते, असे नौशाद अली यांनी सांगितले.

क्‍विंटलला ६०० ते ८०० रुपये दर

सध्या या उसाला ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळत आहे. ७० ते ९० रुपये किलोने याची विक्री केली जाते. बाजारात आवक कमी झाल्यास दरात तेजी येते. मात्र सध्या तरी आवक कमी होण्याची कोणतीच शक्‍यता नाही. परिणामी यापुढील काळात दर स्थिर राहतील, असे नौशाद यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com