Jackfruit Price: सिंधुदुर्गात फणसाला प्रति नगाला ३०० ते ३५० रुपये दर

Jackfruit Season Update: सिंधुदुर्गात फणस हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना प्रति नग ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. विशेषतः ‘कापा’ फणसाला अधिक टिकाऊपणामुळे ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
Jackfruit
JackfruitAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात फणस हंगामाला प्रारंभ झाला असून, फणसाच्या प्रति नगाला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. कापा फणसाला मोठी मागणी ग्राहकांकडून आहे.रासायनिक खते, कीटकनाशकांपासून पूर्णतः अलिप्त असलेले फळ म्हणून फणसाकडे पाहिले जाते. पूर्णतः पांरपरिक पद्धतीनेच फणसाचे उत्पादन घेतले जाते.

काही अपवाद वगळले तर मे महिन्यातच फणस हंगाम सुरू होतो. कोकणात कोवळ्या फणसांची देखील भाजी केली जाते. हे कोवळे फणस पौष महिन्यात अधिकतर उपलब्ध असतात. त्यानंतर पूर्ण तयार झाल्यानंतर भाजीकरिता फणस खरेदी करतात, तर परिपक्व झालेले फणस हे मे महिन्यात विक्रीकरिता येतात.

Jackfruit
Jackfruit Cultivation : फणस लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात परिपक्व फणसांचा हंगाम सुरू झाला आहे. ऐन पर्यटन हंगामात हा हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना दर देखील चांगला मिळतो. फणसामध्ये कापा आणि रसाळ असे दोन प्रकार असतात

Jackfruit
Jackfruit Farming : फणसाच्या उत्पादनात वाढ

कापा फणस अधिक कालावधीसाठी टिकतो त्यामुळे अधिकतर ग्राहक या फणसांची निवड करतात. तर ताबडतोब खाण्यासाठी रसाळ फणस खरेदी करतात. या जातीच्या फणसाचा रसापासून फणसपोळी बनविली जाते.

कापा फणसाला ३५० ते ४०० आकारानुसार त्यापेक्षा अधिक देखील दर मिळत आहे, तर रसाळ फणसाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. पर्यटन हंगाम बहरात असल्यामुळे हा दर आणखी काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे. वटपौर्णिमेपर्यंत फणसाला चांगला दर मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com