
Palghar News : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. आधुनिक पद्धतीने शेती करुन चांगल उत्पन्न मिळवतात. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी नव-नवीन प्रयोग करत आहेत.
आता मागील दोन-चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी कायमचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळ पिकाकडे ओढा वाढला आहे. यात आंबा, काजुसोबत फणस फळ पिका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फणस लागवड सुरु केली आहे.
दरवर्षी सारख्याच पिकांची लागवड करुन कंटाळलेल्या ग्रामीण शेतकरी बांधवांनी कृषी क्षेत्रात काही वेगळे करायचे ठरवले असून ते कायमचे उत्पन्न देणाऱ्या फणसाची लागवड करु लागले आहेत. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
तालुक्यातील ओंदे, शीळ, देहर्जे, कुर्णझे, आलोंडे, मलवाडा भागात शेतकरी फणस या फळ पिकाची लागवड करू लागले आहेत. रोख पैसे अन् जागेवर विक्री उत्पादन वाढले तरी त्याला चांगली बाजारपेठ मिळणेही तेवढेच महत्वाचे आहे. फणस या पिकाला बाजारपेठेतही जाण्याची गरज भासत नाही. कारण ग्राहक थेट शेताच्या बांधावरच येऊन खरेदी करतात.
भाजीसाठी वापर
फणसाचा उपयोग हा भाजीपाला आणि फळ म्हणून देखील केला जातो. त्यामुळे बाजारात फणसाला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी फणसाचे विविध पदार्थ केले जातात त्याचबरोबर लोणचेही केले जाते. जे खायला खूप चवदार असते. फणस पिकल्यावर तो फोडून आतील गरे खाण्यासाठी वापरतात. फणस पिकून मऊ झाल्यावर आतील गरे काढतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.