Turmeric Market : हळदीच्या दरात सुधारणा

Turmeric Market Update : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात सुधारणा आहे.
Turmeric Market Rate
Turmeric Market RateAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात सुधारणा आहे. शनिवारी (ता. १५) वसमत बाजार समिती अंतर्गत कुरुंदा (ता. वसमत) येथील उपबाजारपेठेत हळदीला प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल १९००० रुपये तर सरासरी ११५३२ रुपये दर मिळाले.

कुरुंदा उपबाजारात शनिवारी (ता. १५) हळदीला (कांडी) अनेक वर्षांनंतर उच्चांकी म्हणजेच प्रतिक्विंटल १९००० रुपये दर मिळाला. हळदीच्या चुरीला प्रतिक्विंटल किमान ६७०० ते कमाल ८६१० रुपये तर सरासरी ७९०५ रुपये दर मिळाले. हळदीच्या बंडाला प्रतिक्विंटल किमान ५२०५ ते कमाल ९१९० रुपये तर सरासरी ७९६८ रुपये दर मिळाले.

Turmeric Market Rate
Black Turmeric :काळ्या हळदीचे फायदे भरपूर !

हिंगोली बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. १५) हळदीची २२३१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९००० ते कमाल १२००० रुपये तर सरासरी १०५००

रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १४) हळदीची २३९५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी ९६५० रुपये दर मिळाले.

Turmeric Market Rate
Turmeric Uses : रोज खा हळद आणि पहा शरिरातील बदल

वसमत बाजार समितीत गुरुवारी(ता. १३) हळदीची ५६८८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६०२५ ते कमाल १२५०० रुपये तर सरासरी ९२६२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १२) हळदीची ३७९८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८७०५ ते कमाल १२०० रुपये तर सरासरी १०३५२ रुपये दर मिळाले.

मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात विक्री

हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून हळदीच्या दरात सुधारणा होत आहे. नंबर १ प्रकारच्या हळद कांडीला १० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही दर वाढीचे चिन्ह दिसत नव्हते.

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर हळदीची विक्री केली. मोजक्या शेतकऱ्यांनी हळद साठवून ठेवलेली आहे. त्यांना दरवाढीचा फायदा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com