sandeep Shirguppe
महाराष्ट्रासह देशभरात हळदिचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान हळदिला आयुर्वेदासह स्वयंपाक घरातही मोठे महत्व आहे.
हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. ओल्या हळकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार करण्यासाठी वापरले जाते. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात.
हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, तसेच जखमेवर लावल्यास जंतू नष्ट करण्याचे कामही हळद करते.
दरम्यान हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो, तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो.
हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात.
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १ लाख २५ हजार ८०० हेक्टर असून उत्पादन ५ लाख ५० हजार १८५ मे. टन इतके आहे.
हळद उत्पादनात आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२ हजार ५०० मेट्रिक टन इतके होते.