Team Agrowon
हळद ही प्रामुख्यांने स्वयंपाकघरात वापरली जाते. मात्र त्याशिवाय हळद अनेक गोष्टीसाठी फायदेशीर ठरते.
हळदीचा सर्वसाधारण रंग पिवळा असतो. पिवळ्या रंगाची हळद अनेकदा सौदंर्यप्रसाधनांपासून ते आरोग्यासाठी वापरली जाते.
बाजारात मात्र पिवळ्या हळदीप्रमाणे काळी हळद देखील उपलब्ध आहे. याचे देखील अनेक फायदे आहेत.
काळ्या हळदीची पावडर पाण्यात मिसळून पिल्याने, ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर ही हळद खूप फायदेशीर ठरेल.
सांधेदुखीची समस्या जाणवू लागल्यास ळ्या हळदीची पेस्ट प्रभावित भागात लावल्यास सूज कमी होऊन आराम मिळतो.
या काळ्या हळदीच मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ग्लो येतो. चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्सपासूनही देखील निघून जातात.
जखमेवर आयुर्वेदीक उपाय हवा असल्यास, दुखापती झालेल्या भागावर काळ्या हळदीची पेस्ट प्रभावी ठरते. असे केल्याने जखम लवकर बरी होते.