Banana Rate : केळीच्या दरात सुधारणा

खानदेशात दर्जेदार किंवा उत्तम प्रतीच्या केळीचे दर १६५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर १००० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. उत्तर भारतासह राज्यातून मागणी असल्याने दरात सुधारणा झाली आहे.
Banana Rate
Banana RateAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात दर्जेदार किंवा उत्तम प्रतीच्या केळीचे दर (Banana Rate) १६५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर (Quality Banana Rate) १००० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. उत्तर भारतासह राज्यातून मागणी (Banana Demand) असल्याने दरात सुधारणा झाली आहे.

Banana Rate
Banana Farming : सोलापूर जिल्ह्यात वेलची, ‘रेड बनाना’ केळीवाणांचा यशस्वी प्रयोग

कांदेबाग (मागील सप्टेंबर, ऑक्टोबरमधील लागवडीची केळी) केळीची काढणीदेखील सुरू झाली आहे. आगाप लागवड अनेकांनी मागील सप्टेंबरमध्ये केली होती. या केळीत काढणी सुरू असून, या केळीलाही १६५० रुपयांवर दर आहे. कांदेबाग केळीची काढणी धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा या भागात सुरू आहे. दर्जेदार केळीची पाठवणूक उत्तरेकडे काश्मीर, पंजाब, दिल्ली येथे केली जात आहे. तसेच उशिराच्या मृग बहर (मागील जुलै व ऑगस्टमधील लागवड) केळीलादेखील १६०० रुपयांवर दर आहेत.

खानदेशात दर्जेदार केळीला १६०० वर भाव

सध्या राज्यात सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, श्रावणातही केळीला उठाव होता. यामुळे केळी दरातील घसरण थांबली होती. गणेशोत्सव काळात केळीला कमाल १३०० रुपये दर खानदेशात मिळाला. परंतु मृग बहर केळीची आवक कमी झाली. तसेच कांदेबाग केळीचीही आवक वाढलेली नाही. फक्त आगाप लागवडीच्या कांदेबाग केळीची आवक सुरू आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली आहे. कमी दर्जाच्या केळीला राजस्थान, नागपूर, छत्तीसगड आदी भागांत उठाव आहे. पुढे नवरात्रोत्सव आहे. यामुळे केळी दरात घसरण होणार नाही, असाही कयास आहे. सध्या खानदेशात रोज १९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. धुळ्यातील शिरपुरात आवक वाढली आहे. तापी, अनेर काठी कांदेबाग केळी या भागात अधिक असते. दर्जेदार केळीची आवक या भागात होत आहे. जळगावमधील रावेर, यावल व मुक्ताईनगर या भागांतील आवक कमी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com