Onion Seedling Demand: कांदा रोपे विक्रीला खानदेशात प्रतिसाद

Khandesh Onion Farming: खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस चांगला राहिल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारात कांदा लागवड वाढली आहे. कांदा विक्रीसही प्रतिसाद मिळाला असून, अनेक रोपवाटिकाचालकांना नफा हाती राहिला आहे.
Rabi Onion Cultivation
Rabi Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस चांगला राहिल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारात कांदा लागवड वाढली आहे. कांदा विक्रीसही प्रतिसाद मिळाला असून, अनेक रोपवाटिकाचालकांना नफा हाती राहिला आहे.

धुळ्यात २० हजार हेक्टरवर, जळगावात सुमारे आठ हजार हेक्टर आणि नंदुरबारात तीन हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. यंदा जुलै आणि ऑगस्टमध्येही कांदा लागवड कमी झाली होती. पावसाअभावी अतिपावसानेही नुकसान झाले. धुळे, नंदुरबार व जळगावात पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बीतील लागवड वाढली.

Rabi Onion Cultivation
Onion Crop Damage : येवल्यातही कांदा लागवडीचे तणनाशक फवारणीमुळे नुकसान

धुळ्यात रब्बीतील कांद्याचे क्षेत्र सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहे. जळगाव जिल्ह्यातही कांदा लागवड वाढली आहे. ज्यांनी कांद्याचे रोप वाढविले, त्यांच्या रोपांची हातोहात विक्री झाली. धुळ्यात कांद्याचे धुळे आणि साक्री तालुक्यात, जळगावात यावल, चाळीसगाव, चोपडा भागांत मोठे उत्पादन घेतले जाते.

धुळ्यातील न्याहळोद, कापडणे, देवभाने, सरवड, नंदाणे, बुरझड, बोरीस, निकुंभे, लामकानी, दुसाणे, निजापूर, जैताणे हा कांदापट्टा म्हणून ओळखला जातो. या भागासह खानदेशात विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी स्थिर आहे. याचा परिणाम कांदा लागवडीत वाढीसंबंधी झाला आहे.

Rabi Onion Cultivation
Onion Crop Damage : येवल्यातही कांदा लागवडीचे तणनाशक फवारणीमुळे नुकसान

रोपवाटिकादेखील पडल्या कमी

खानदेशात खरिपाच्या तुलनेत रब्बीत कांद्याची लागवड अधिक प्रमाणात होते. शेतकरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याचे बियाणे रोपवाटिकांत टाकतात. यंदा रोपवाटिकादेखील कमी आहेत. रोपवाटिका एक दीड महिन्यात रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. मध्यंतरी कांदा दरात सुधारणा झाली, यामुळे कांदा लागवड जानेवारीच्या मध्यातही सुरू होती.

कांदा रोपांची सतत मागणी असल्याने रोपवाटिका कमी पडल्याची स्थिती यंदा होती. कांद्यासह खानदेशात वांगी, कोबी, गिलके, मुळा, कारली, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाल्यांचे उत्पादनही अधिक घेतले जाते. पाण्याची उपलब्धता आहे. भाजीपाला क्षेत्रही वाढले आहे. यामुळे पुढे खानदेशात भाजीपाला उत्पादन चांगले राहील, अशी स्थिती आहे. कलिंगड, खरबूज, टोमॅटो लागवडही वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com