Onion Crop Damage
Onion Crop Damage Agrowon

Onion Crop Damage : येवल्यातही कांदा लागवडीचे तणनाशक फवारणीमुळे नुकसान

Onion Cultivation : मुखेड परिसरात कालव्याच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टरवर कांद्याचे पीक जोमात आहे. मात्र या पिकातील वाढत्या तणामुळे काही शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केली असता सुमारे १५ हेक्टरवर फवारणीनंतर दोन दिवसांतच कांद्याचे पीक जळू लागले.
Published on

Nashik News : कांदा शेतातील तण जाळण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली जाते; पण मुखेड (ता. येवला) येथे तणनाशक फवारल्याने तणाबरोबरच १५ हेक्टरवरील कांद्याचेही नुकसान होऊन सुमारे १७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे पीक घेतले आहे. मुखेड परिसरात कालव्याच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टरवर कांद्याचे पीक जोमात आहे.

Onion Crop Damage
Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

मात्र या पिकातील वाढत्या तणामुळे काही शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केली असता सुमारे १५ हेक्टरवर फवारणीनंतर दोन दिवसांतच कांद्याचे पीक जळू लागले. तब्बल १७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

शेतकरी विकास आहेर, मनोज आहेर, तुकाराम घोटेकर, शशिकला आहेर, महेश सानप, सूर्यभान मोरे, राजेंद्र अमराळे, विनायक आहेर, सुनील सांगळे, कैलास जुगृत, मधुकर पानसरे, शांताराम आहेर, परसराम शिंदे, नामदेव जाधव, प्रतिभा शिंदे, दत्तात्रय वावधने, रामा दराडे, राजेंद्र सानप यांनी कृषी विभागाकडेही तक्रार केली होती.

Onion Crop Damage
Onion Crop Damage : तणनाशक फवारणीमुळे कांदा पीक जळाले

यासंदर्भात रविवारी (ता. २) तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, कृषी सहायक सोमवंशी, कृषी अधिकारी किरण मोरे, कंपनीचे प्रतिनिधी, कुणाल दराडे, तालुकाप्रमुख छगन आहेर यांनी पिकांची पाहणी केली.

कृषी विभागाने या तणनाशकावर विक्री बंद आदेश काढल्याचे बेरड यांनी सांगितले. संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीसह कृषी विभागाला धारेवर धरत तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com