Team Agrowon
कोल्हापुरातील रुकडी येथील महेश लोखंडे यांनी दहा गुंठे क्षेत्रात शंकेश्वरी वाणाच्या मिरचीची लागवड केली.
लोखंडे यांनी केवळ मिरचीची लागवड केली नाही तर त्यात मेथीचे आंतरपीक घेतले आहे.
१२ जुलैला त्यांनी जवळपास अडीच हजार रोपे लावली. साधारणतः 90 दिवसानंतर त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली.
शेतामध्ये ते स्वतः व कुटुंबीय काम करतात, मिरचीचा तोडा झाल्यानंतर ती घरीच वाळवली व विक्री केली जाते एक किलो वाळलेल्या मिरचीला साधारणतः बाराशे रुपये एवढा दर त्यांना मिळत आहे.
आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले होते. सोयाबीनचे जवळपास दीड क्विंटल उत्पादन मिळाले. सोयाबीन नंतर त्यांनी मेथीचे आंतरपीक घेतलेले आहे.
मिरची लागवडीतून त्यांना जवळपास 22 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे, असेही लोखंडे यांनी सांगितले.