Farmer
FarmerAgrowon

Chana Sowing : हरभऱ्याची साडेदहा हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात यंदा उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या पावसामुळे रब्बी पेरणी लांबली आहे. त्यात अजूनही अनेक ठिकाणी जमीन वाफशावर नाही तसेच मशागतीच्या कामे रखडल्यामुळे पेरणीची गती संथ आहे.
Published on

हिंगोली ः जिल्ह्यात यंदा उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या पावसामुळे रब्बी पेरणी (Rabi Sowing) लांबली आहे. त्यात अजूनही अनेक ठिकाणी जमीन वाफशावर नाही तसेच मशागतीच्या कामे रखडल्यामुळे पेरणीची (Sowing) गती संथ आहे. शुक्रवार (ता. ४)पर्यंत जिल्ह्यात ११ हजार ८२७ हेक्टरवर (६.७ टक्के) रब्बीची पेरणी झाली. त्यात हरभऱ्याच्या (Chana Sowing) १० हजार ७४८ क्टर पेरणीचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. शुक्रवार पर्यंतच्या पेरणी क्षेत्रात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १० हजार ७४८ हेक्टरवर (८.९३ टक्के), ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १ हजार ६९ हेक्टर (९.१४ टक्के), करडईची २०५ पैकी २५ हेक्टर (१२.१६ टक्के) पेरणी झाली.

Farmer
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

जिल्ह्यात यंदा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे सोयाबीनच्या सुगीची कामे खोळंबली. तणांची वाढ झाली आहे. सखल भागातील अनेक ठिकाणची जमीन अद्याप वाफसावर नाही. मशागतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्यामुळे पेरणी लांबत चालली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com