Kabuli Chana: काबुली हरभरा भाव खाणार

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याच्या दराने मोठी झेप घेतली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारत काबुली हरभऱ्याला वाढलेली मागणी कायम आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत.

देशात मागील हंगामात काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं होतं. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही काबुली हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सध्या दर तेजीत आहेत.

चालू आठवड्यातही काबुली हरभऱ्याच्या दरातील तेजी कायम राहू शकते. निर्यातीसाठी मागणी कशी राहते, यावरही काबुली हरभऱ्याचे दर टिकून आहेत.

सध्या काबुली हरभऱ्याचा मोठा साठा मोठ्या स्टाॅकिस्टच्या ताब्यात आहे. त्यामुळे या स्टाॅकिस्टना मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रक्रियादारांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सध्या देशातील बाजारात काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र पुढील माल हातात येईपर्यंत म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत काबुली हरभरा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

क्रिसमसच्या काळात काबुली हरभऱ्याला आणखी मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तर नोव्हेंबपासून आखाती देशांकडून मागणी येईल, असंही काही निर्यातदार सांगत आहेत. त्यामुळे पुढील काळात काबुली हरभरा आणखी भाव खाण्याचा अंदाज आहे.

cta image